भारत हा पाकिस्तान, नेपाळ आणि बांगलादेश पेक्षाही गरीब : मेहबुबा मुफ्ती

श्रीनगर : जम्मू – काश्मीरमधील पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या नेत्या आणि माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती रोजगाराबाबत सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. गरिबीच्या बाबतीत भारत देश पाकिस्तान, बांग्लादेश आणि नेपाळच्याही मागे आहे, अशी मुक्ताफळं त्यांनी उधळली आहेत.

भाजप सरकार, लोकांना रोजगार देऊ शकत नाही हे दुर्दैवी असून, महागाईने सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. दुसरीकडे आपल्या देशाची मालमत्तेकफह एखजगीकरण केले जात असून, भाजपकडे लोकांना देण्यासारखे काहीच नसल्याचे मुफ्ती म्हणाल्या.

या विषयापासून भटकवण्यासाठी केंद्र असहकार सामान्यांना मुस्लिमांच्या मागे लावत आहे. त्यात मशिदी, ताजमहाल आणि इतर गोष्टींचा समावेश आहे. देशाची लूट करून पळून गेलेल्या लोकांचे पैसे परत मिळवण्याऐवजी त्यांना मुघल काळात बांधलेल्या मालमत्तांचे नुकसान करायचे असल्याचा आरोपही मुफ्ती यांनी केला आहे.

Dnyaneshwar: