नवी दिल्ली : भारतासह हे संपूर्ण जग, हे परिवर्तनशील आणि स्थिर, सर्व काही कालीमातेच्या चैतन्याने व्यापलेले आहे. बंगालच्या काली पूजेमध्ये हे चैतन्य दिसून येते. हीच जाणीव बंगाल आणि संपूर्ण भारताच्या श्रद्धेमध्ये दिसून येते आणि जेव्हा श्रद्धा शुद्ध असते तेव्हा शक्ती आपल्याला मार्गदर्शन करते. त्यामुळे कालीमातेसंबंधी आक्षेपार्ह बोलणार्यांनी भारतीय संस्कृतीची बूज राखावी, अशा शब्दांत पंतप्रधान नद्र मोदी यांनी तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली.
माँ काली वादाच्या पार्श्वभूमीवर मोदी म्हणाले, सर्व काही आईच्या चेतनेमध्ये व्यापलेले आहे. माँ कालीचा आशीर्वाद सदैव देशावर आहे. पंतप्रधान मोदी रविवारी स्वामी आत्मस्थानंद यांच्या शताब्दी सोहळ्याला संबोधित करत होते.
स्वामी आत्मस्थानंद चरित्राचे मोदींच्या हस्ते प्रकाशन
स्वामी आत्मस्थानंद यांचा जन्मशताब्दी सोहळा वैयक्तिकरीत्या माझ्यासाठीही अनेक भावना आणि आठवणींनी भरलेला आहे. मला स्वामी आत्मस्थानंदजींचा आशीर्वाद नेहमीच लाभला आहे. शेवटच्या क्षणापर्यंत मी त्यांच्या संपर्कात राहिलो हे माझे भाग्य. पीएम मोदी म्हणाले, मला आनंद आहे की त्यांचे जीवन आणि ध्येय लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आज चित्रा चरित्र आणि माहितीपट या दोन स्मृती आवृत्तीचे प्रकाशन होत आहे.
पंतप्रधान म्हणाले, स्वामी रामकृष्ण परमहंस हे असे संत होते ज्यांना काली मातेचे स्पष्ट दर्शन होते, ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य कालीमातेच्या चरणी समर्पित केले होते. ते म्हणायचे, हे सर्व जग, हे परिवर्तनशील आणि स्थिर, सर्व काही मातेच्या चैतन्याने व्याप्त आहे. बंगालच्या काली पूजेमध्ये ही जाणीव दिसते. हीच जाणीव बंगाल आणि संपूर्ण भारताच्या श्रद्धेमध्ये दिसून येते. पण बंगालमधीलच संसद सदस्य कालीमातेवर टीका कसे काय करु शकतात?
जेव्हा श्रद्धा शुद्ध असते तेव्हा शक्ती आपल्याला मार्गदर्शन करते. कालीमातेचे अमर्याद आणि अमर्याद आशीर्वाद भारतावर आहेत. आज भारत या अध्यात्मिक उर्जेने विश्व कल्याणाच्या भावनेने पुढे जात आहे, अस्सेही मोदी यांनी सांगितले.
शेकडो वर्षांपूर्वीचे आदी शंकराचार्य असोत किंंवा आधुनिक काळातील स्वामी विवेकानंद असोत, आपली संत परंपरा नेहमीच ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ ची घोषणा करत आली आहे. रामकृष्ण मिशनची स्थापना याच कल्पनेशी निगडित आहे. तुम्ही देशाच्या कोणत्याही भागात जा, विवेकानंदांचे वास्तव्य नसलेले किंवा त्यांचा प्रभाव नसलेले क्षेत्र तुम्हाला क्वचितच सापडेल असे मोदी म्हणाले.