मणिपूरमधील जनतेच्या पाठीशी भारत : पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली | PM Narendra Modi – लाल किल्ल्यावर भारतीय स्वातंत्र्याच्या ७७ व्या वर्धापनदिनाचे ध्वजारोहण पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना पंतप्रधान मोदींनी मणिपूरचा उल्लेख केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, संपूर्ण देश मणिपूरच्या जनतेबरोबर आहे. तेथील समस्या शांततेच्या मार्गाने सुटतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मणिपूरमध्ये अशांतता आणि हिंसाचार सुरू आहे आणि महिलांच्या प्रतिष्ठेवर हल्ला झाल्याच्या बातम्या येत आहेत असे ते म्हणाले. मणिपूरचे लोक काही काळ शांतता राखत आहेत आणि शांततेची प्रक्रिया पुढे सुरू राहावी, असे त्यांनाही वाटत असल्याचे त्यांनी नमूद केले. “तिथल्या समस्या सोडवण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकार एकत्रितपणे काम करत आहेत आणि यापुढेही करत राहतील, असे ते म्हणाले.

पुढे मोदी म्हणाले, जगातील सर्वात मोठी लोकशाही आणि आता अनेकांचे असे म्हणणे आहे की लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून देखील आपण जगात पहिल्या क्रमांकावर आहोत. इतका मोठा विशाल देश, १४० कोटी लोकांचा देश, हे माझे बंधू-भगिनी, माझे कुटुंबीय, आज स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करत आहेत. मी देशाच्या कोटी कोटी लोकांना, देश आणि जगातील भारतावर प्रेम करणाऱ्या, भारताचा सन्मान करणाऱ्या, भारताचा गौरव करणाऱ्या कोटी कोटी व्यक्तींना मी स्वातंत्र्याच्या या महान सोहळ्याच्या अनेकानेक शुभेच्छा देतो. पूज्य बापुजींच्या नेतृत्वाखाली असहकार आंदोलन, सत्याग्रहाची चळवळ आणि भगतसिंग, सुखदेव राजगुरू यांच्यासारख्या असंख्य वीरांचे बलिदान. त्या पिढीत क्वचितच अशी एखादी व्यक्ती असेल जिने देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत स्वतःचे योगदान दिले नसेल. देशाच्या स्वातंत्र्य युद्धात ज्यांनी ज्यांनी योगदान दिले आहे, बलिदान दिले आहे, त्याग केला आहे, तपस्या केली आहे त्या सगळ्यांना मी आज आदरपूर्वक प्रणाम करतो, त्यांचे अभिनंदन करतो. असे ही ते म्हणाले. आज १५ ऑगस्टला, महान क्रांतिकारक आणि अध्यात्म जीवनातील ऋषीतुल्य प्रणेता श्री अरविंदो यांची दीडशेवी जयंती पूर्ण होत आहे. हे वर्ष स्वामी दयानंद सरस्वती यांच्या दीडशेव्या जयंतीचे वर्ष आहे, हे वर्ष राणी दुर्गावती यांच्या ५०० व्या जयंतीचे अत्यंत पवित्र वर्ष आहे आणि हे वर्ष संपूर्ण देश अत्यंत उत्साहाने साजरे करणार आहे. हे वर्ष, भक्तीयोगाची सर्वश्रेष्ठ संत मीराबाई यांच्या पाचशे पंचविसाव्या वर्षाचे पवित्र पर्व आहे. प्रगतीच्या प्रत्येक मार्गावर, मात्र आपण २०४७ पर्यंत आपण एक विकसित देशांचे स्वप्न घेऊन वाटचाल करतो आहोत, तेव्हा; आणि ते स्वप्न नाही- १४० कोटी देशबांधवांचा संकल्प आहे. आणि हा संकल्प सिद्ध करण्यासाठी परिश्रमांची पराकाष्ठा देखील केली जात आहे. आणि त्याची सर्वात मोठी ताकद असते, ती असते राष्ट्रीय चारित्र्य. जगातील ज्या ज्या देशांनी प्रगती केली, जगात जे जे देश संकटांवर मात करून पुढे गेले आहेत, त्या प्रत्येक देशात इतर सर्व गोष्टींसोबत एक अत्यंत महत्वाचा उत्प्रेरक असतो. आणि तो म्हणजे, त्या देशाचे राष्ट्रीय चारित्र्य. आणि आपल्याला राष्ट्रीय चारित्र्यावर अधिक भर देत आपल्याला पुढे जावे लागेल.

Sumitra nalawade: