इंदूर : (India vs Australia 3rd Test Day 2) भारताने पहिल्या डावात 109 धावा केल्यानंतर कांगारूंचा पहिला डाव 197 धावात संपुष्टात आणला होता. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 88 धावांची महत्वपूर्ण आघाडी घेतली होती. भारतावर दुसऱ्या डावात ही आघाडी कमी करून कांगारूंना आव्हानात्मक टार्गेट देण्याचा दबाव होता. अशा दबावाच्या परिस्थितीत भारताची भिंत पुन्हा एकदा ढासळली. सलामीवीर शुभमन गिलने 5 धावा करून रोहितची साथ सोडली. त्यानंतर चेतेश्वर पुजारा आणि रोहितने भारताचा डाव पुढे नेण्या सुरूवात केली.
मात्र कर्णधार लयॉनच्या जाळ्यात फसला आणि 12 धावांचे योगदान देत माघारी फिरला. यानंतर विराट कोहली 12 तर रविंद्र जडेजा 7 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतले. मात्र एका बाजूने चेतेश्वर पुजारा एकहाती झुंज देत आहे. तो ऑस्ट्रेलियाच्या फिरकीपटूंचा नेटाने सामना करत होता. पुजारानेही आपले झुंजार अर्धशतक पूर्ण केले.
पुजाराने भारताचे शतक पार करून दिले. त्याला साथ देण्यासाठी आलेल्या श्रेयसने आक्रमक धावा करत त्याला साथ देण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी भारताला आघाडी मिळवून देण्यास सुरूवात केली. मात्र स्टार्कने त्याची ही 26 धावांची खेळी संपवली. त्यानंतर श्रीकार भरत देखील 3 धावांचे योगदान देत बाद झाला.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतसाठी ऑस्ट्रेलियाचे समीकरण स्पष्ट आहे. भारताविरुद्धच्या दोन सामन्यांपैकी किमान एकात पराभव टाळावा लागणार आहे. म्हणजेच ऑस्ट्रेलिया 3-0 किंवा 3-1 ने मालिका गमावला तरी अंतिम फेरीसाठी पात्र ठरेल. जर ऑस्ट्रेलियाने दोन्ही सामने गमावले, तर अंतिम फेरी गाठण्यासाठी श्रीलंकेला न्यूझीलंडविरुद्धची मालिका 2-0 ने जिंकावी लागेल, त्यात अपयशी ठरल्यास भारत-ऑस्ट्रेलिया अंतिम सामना खेळतील.