BCCI चा केएल राहुलला दणका! उपकर्णधारपद घेतलं काढून; मालिकेत खेळणार की नाही यावर प्रश्नचिन्ह

इंदूर : (India vs Australia 3rd Test) भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या चार कसोटी सामन्याच्या मालिकेतील उद्यापासून तिसरा सामना इंदूर मैदानवर खेळला जाणार आहे. मात्र, सामन्याच्या एक दिवस आधीच कर्णधार रोहित शर्माने केएल राहुलला उपकर्णधारपदावरून हटवण्यात आल्याचं सांगितलं आहे.

दरम्यान, मागिल अनेक सामन्यात खराब कामगिरी करणारा भारताचा पहिल्या फळीतील फलंदाज केएल राहुल याला क्रिकेटप्रेमींकडून टीकेचे धनी व्हावं लागत आहे. त्यामुळे राहुलला प्लेइंग-11 मध्ये स्थान मिळणार की नाही हा प्रश्न भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या मनात होता अखेर आज त्याला पूर्णविराम मिळाला आहे. निवड समितीने त्याला संघात ठेवले, मात्र उपकर्णधारपद त्याच्याकडून काढून घेण्यात आले.

यावर रोहित शर्माने मौन सोडले आणि म्हणाला की, केएल राहुलला उपकर्णधारपदावरून हटवण्यात काही अर्थ नाही. या गोष्टीला फार महत्त्व देऊ नये. केएल राहुलला वाईट काळात कर्णधार आणि संघ व्यवस्थापनाचा पूर्ण पाठिंबा असल्याचे रोहित शर्माच्या वक्तव्यावरून स्पष्ट दिसत होता. मात्र प्लेइंग-11 मध्ये केएल राहुलच्या जागेवर सातत्याने प्रश्न उठत आहे. सराव सत्रादरम्यान प्रशिक्षक राहुल द्रविडने शुभमन गिलसोबत बराच वेळ घालवला आहे. अशा स्थितीत शानदार फॉर्मात असलेला गिल तिसऱ्या कसोटीत राहुलची जागा घेऊ शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे.

केएल राहुलनंतर संघाला कोणताही नवीन उपकर्णधार मिळालेला नाही. बीसीसीआयने संघ जाहीर करताना कोणालाही उपकर्णधार बनवले नाही. कर्णधार रोहित शर्माकडे उपकर्णधार नियुक्तीचे अधिकार असतील, असे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. पुजारा, अश्विन आणि जडेजा हे उपकर्णधारपदाचे दावेदार म्हणून पाहिले जात आहेत. तिसऱ्या कसोटीत या तिघांपैकी एक उपकर्णधारपदाची जबाबदारी सांभाळताना दिसतो.

Prakash Harale: