India vs Australia WTC final 2023 : 7 जून पासून भारत (Team India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्या रंगत असलेला आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 (ICC World Test Championship Finals) चा सामना खेळला जात आहे. पहिल्या दिवशी सुरुवातीला भारतीय गोलंदाजांनी कांगारूंचा धुव्वा उडवला. WTCचा किताब टीम इंडीयाल मिळणार असं प्रत्येक क्रिकेटप्रेमींना वाटतं होतं. परंतू ऑस्ट्रेलियाचा हुकमी एक्का समजला जाणारा खेळाडू मैदानात उतरला आणि खेळचं रुपचं बदललं. कांगारूंच्या केवळ 76 धावांवर 3 बाद अशी परिस्थिती असताना मैदानात उतरलेली स्टिव्ह स्मिथ आणि ट्रॅव्हिस हेड या जोडीनं भारतीय गोलंदाजांची धू धू पिटाई केली. अन् टीम इंडियासमोर 327 धावांचा भला मोठा डोंगर उभा केला.
आज गुरुवार दि. 8 जून रोजी कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली. यावेळी 3 विकेट्सवर 327 धावांच्या पुढे खेळायला सुरुवात केली. दुपारी 3 वाजता सुरु झालेल्या या सामन्याकडे सर्व क्रिकेटप्रेमींच्या नजरा लागल्या आहेत. कसोटी भारताच्या हातून निसटत जात होती. माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथ आणि ट्रॅव्हिस हेड या जोडाला लगाम घालणं टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर मोठं आव्हान उभं राहिलं होतं. स्मित 95 धावांवर तर ट्रॅव्हिस हेड 146 धावांवर खेळत होते.
दरम्यान, दुसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी जादूची कांडी फिरवली अन् सुसाट सुटलेल्या कांगारूंच्या स्मिथ-हेड जोडीला मोहम्मद सिराजनं लगाम लावला. 161 धावांवर ट्रॅव्हिस डेडला सिराजनं पव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्यानंतर आलेल्या कॅमरन ग्रिनला आवघ्या 6 धावांवर मोहम्मद शमीने तंबूत पाठवलं. पाचवा धक्का कांगारूंना पचतो न पचतो तोच शर्दुल ठाकूरने हुकमी एक्का स्टिव्ह स्मिथला बाद करून सामना फिरवला. मिशेल स्टार्क 5 धावांवर बाद झाला. आज आवघ्या 90 धावांवर कांगारूंच्या चार खेळाडूंना माघारी पाठवण्यात टीम इंडिया यश आलं आहे. 422 धावांवर 7 बाद अशी कांगारूंची स्थिती आहे. तर विकेटकीपर एलेक्स केरी 22 धावांवर नाबाद तर कर्णधार पॅट कमिंस 2 धावांवर मैदानावर खेळत आहेत.
भारतीय गोलंदाजांनी केवळ 76 धावांत ऑस्ट्रेलियाच्या टॉप-3 फलंदाजांना आपली शिकार बनवलं होतं. डेव्हिड वॉर्नर (43), उस्मान ख्वाजा (0) आणि मार्नस लबुशेन (26) बाद झाले. सिराज, शामी आणि शार्दुल यांना 1-1 विकेट घेण्यात यश मिळाले होते. भारतीय संघ लवकरच सामन्यावर आपली पकड घट्ट करेल आणि कांगारूंचा स्कोअर 250 किंवा 300 धावांच्या आतच आपला गाशा गुंडाळेल असं वाटत होतं, पण तसं झालं नाही.
क्रिजवर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टिव स्मिथ उभा होता. जणू तो काहीतरी मनाशी ठरवूनच आला होता. स्मिथचा ओव्हलवरचा आजवरचा रेकॉर्ड भारीच आहे, त्यात वादच नाही. कदाचित टीम इंडियानंही सामन्यापूर्वी कांगारुंच्या संघातील हुकमी एक्का स्टिव्ह स्मिथचा अभ्यास केला असेल. पण ही तयारी अजिबात कामी आली नाही. स्टिव्ह स्मिथला रोखण्यात रोहित सेनेतेल शिलेदार कमी पडले. आणि शेवटी ज्याची भिती होती तेच झालं. स्मिथनं आपल्या दमदार खेळीनं पहिल्या दिवसावर ऑस्ट्रेलियाचं वर्चस्व कायम ठेवलं.
पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत स्मिथ आणि हेड यांनी चौथ्या विकेटसाठी नाबाद 251 धावांची भागीदारी केली. अशा स्थितीत टीम इंडियाच्या गोलंदाजांना आणखी चांगल्या तयारीनं मैदानात उतरावं लागेल. यासोबतच विशेष रणनीतीही आखावी लागणार आहे. भारतीय चाहत्यांच्या नजरा आता दुसऱ्या दिवसाच्या खेळाकडे लागल्या आहेत. भारतीय गोलंदाजांनी झटपट विकेट घेतल्या आणि ऑस्ट्रेलियाला 450 धावांच्या आत थोपवलं तर टीम इंडियासाठी जेतेपदाचा मार्ग काहीसा सोपा असेल.