टीम इंडिया वर्षीचा शेवट करणार गोड? मालिका जिंकण्यासाठी केवळ 145 धावांची गरज!

ढाका : (India Vs Bangladesh 2nd test Match 3rd Day 2022) बांगलादेश विरुद्ध भारत यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना गुरूवार (२२ डिसेंबर) पासून सुरू आहे. या सामन्याचा आज तिसरा दिवस असून यावर्षाचा शेवट गोड करण्यासाठी भारतीय संघ हा सामना जिंकण्याच्या प्रयत्नाची शिकस्त करणार हे निश्चित मानले जात आहे.

यजमान बांगलादेशाच्या संघाने दुसऱ्या डावातही निराशा पाहायला मिळाली. झाकीर हसन आणि लिटन दास यांनी झुंजार फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना मोठी मजल मारता आली नाही. त्यामुळे बांगलादेशाचा डाव केवळ २३१ गारद करण्यात भारतीय गोलंदाजांना यश आलं आहे. लिटन दासने 73 आणि झाकीर हसन 51 धावा करत शानदार अर्धशतकांची खेळी.

तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रातच मोहम्मद सिराज आणि आर अश्विन यांनी बांगलादेशला लागोपाठ दोन धक्के दिले आहेत. ढाकामध्ये सुरू असलेल्या या सामन्याचे पारडे कधी बांगलादेश तर कधी भारताकडे झुकताना दिसत आहे. भारताने पहिल्या डावात ३१४ धावसंख्या उभारत ८७ धावांची आघाडी घेतली होती. बांगलादेशने दुसऱ्या डावात २३१ एवढी धावसंख्या केली. भारताने घेतलेली ८७ आघाडी मागे टाकत भारतावर १४४ धावांची आघाडी घेतली. तर दुसऱ्या डाव खेळण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची 29 धावांवर 2 बाद अशी स्थिती आहे. भारताला विजय संपादन करण्यासाठी 116 धावांची गरज आहे.

Prakash Harale: