Ind vs Eng : सामन्यापूर्वीच टीम इंडियाला दुखापतीचे ग्रहण! नेटमध्ये दिग्गज खेळाडू जखमी

Team News 1Team News 1

हैदराबाद : (India vs England Test Series) भारत आणि इंग्लंड यांच्यात होणारी कसोटी मालिका हैदराबादच्या राजीव गांधी मैदानावर गुरुवार 25 जानेवारीपासून रंगणार आहे. मात्र, पहिल्या कसोटीपूर्वीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे ऐन मालिकेच्या तोंडावर टीम इंडियाला दुखापतीचे ग्रहण लागले आहे.

भारताच्या सराव सत्रादरम्यान मंगळवारी नेटमध्ये फलंदाजी करताना श्रेयस अय्यरच्या उजव्या हाताला दुखापत झाली. आज सकाळी सराव सत्रात श्रेयस अय्यरच्या डाव्या मनगटावर वेगाने आलेला चेंडू लागला. त्यावेळी ऐनवेळी टीम इंडियाच्या वैद्यकिय टीमची दमछाक झाली, त्यानंतर एक चेंडू खेळल्यानंतर तो मैदानातून बाहेर आला. मग वैद्यकिय टीमने श्रेयस अय्यरच्या डाव्या मनगटावर आईस पॅक ठेवला. या दुखापतीमुळे टीम इंडियाला हा मोठा धक्का मानला जात आहे.

दरम्यान, अय्यरच्या दुखापतीमुळे टीम इंडियाचा मधल्या फळीतील फलंदाजीचा प्रश्न पुढे आला आहे. ही एक प्रकारे भारतीय संघाची डोकेदुखी असू शकते. विराट कोहलीही पहिल्या दोन कसोटींसाठी उपलब्ध नाही. एक दिवस आधी त्याने वैयक्तिक कारणांमुळे पहिल्या दोन सामन्यांमधून आपले नाव मागे घेतले होते. अशा परिस्थितीत मधल्या फळीची जबाबदारी फक्त अय्यर आणि केएल राहुलवर आहे. कोहलीच्या जागी रिंकू सिंग, रजत पाटीदार आणि सरफराज खान यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकते.

Prakash Harale:
whatsapp
line