नाणेफेक जिंकून टीम इंडियाचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय; ODI जिंकली आता T20 जिंकणार?

रांची : (India vs New Zealand 1st T20 Series 1st Match 2023) भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी२० मालिका शुक्रवारी (२७जानेवारी) सुरू होईल. मालिकेतील पहिला सामना एमएस धोनी याचे होम ग्राउंड झारखंड स्टेट क्रिकेट असोसएशन मैदानावर खेळला जाणार आहे. या सामन्यात खेळपट्टी कशी खेळणार हा सर्वात मोठा प्रश्न असून त्यानुसारच विजयाचे गणित अवलंबून असणार आहे.

हार्दिक पंड्या याला या टी२० मालिकेतन संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. अशात पहिला सामना जिंकवून हार्दिक मालिकेची सुरुवात गोड करण्याच्या प्रयत्नात असेल. पाहुण्या न्यूझीलंड संघाला भारताने तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत क्लीन स्वीप दिला. पण टी२० मालिकेत न्यूझीलंडचे आव्हान संघासाठी सोपे नसेस. टी२० मालिकेत रोहित शर्मा आणि विराट कोहली हे वरिष्ठ खेळाडून खेळत नसल्यामुळे संघ युवा खेळाडूंनी भरला आहे.

रोहितच्या अनुपस्थितीत हार्दिक पांड्या पुन्हा एकदा संघाचे नेतृत्व करणार आहे. कर्णधाराच्या रूपात हार्दिक पांड्याची कामगिरी चांगली राहिली असली, तरी न्यूझीलंडसारख्या बलाढ्य संघाला मात देणे सोपे नसेल. पहिल्या सामन्यादरम्यान भारतीय संघाच्या वेगवान गोलंदाजीची मदारअर्शदीप सिंग आणि उमरान मलिक यांच्या खांद्यावर आहे. उमरानमध्ये ताशी १५५ किलोमीटर वेगाने गोलंदाजी करण्याची क्षमता आहे. त्याच वेळी, डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप अत्यंत घातक स्विंग गोलंदाजीसाठी ओळखला जातो.

Prakash Harale: