भारतीय गोलंदाजांचा भेदक मार, न्युझीलंडचा संपुर्ण संघ 108 धावांवर गार!

रायपूर : (India vs New Zealand 2nd ODI) भारताने दुसऱ्या वनडे सामन्यात न्यूझीलंडला अवघ्या 108 धावात गुंडाळले. रायपूरच्या फ्रेश विकेटवर भारतीय वेगवान गोलंदाजांनी किवींची अवस्था 5 बाद 15 धावा अशी केली होती. मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांनी सुरूवातीला किवींना धक्के दिले.

त्यानंतर ग्लेन फिलिप्सने आधी मायकेल बार्सवेल आणि नंतर मिचेल सँटनरसोबत छोटी भागीदारी रचत संघाला शतकी मजल मारून दिली. मात्र हार्दिक पांड्या, शार्दुल ठाकूर यांनी न्यूझीलंडची मधील फळी कापून काढली. त्यांना वॉशिंग्टन सुंदर आणि कुलदीप यादव यांनी चांगली साथ देत शेपुट गुंडाळात किवींचा डाव 108 धावात संपवला.

भारताकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. त्यानंतर हार्दिक पांड्या आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी 2 विकेट्स पटकावल्या. शार्दुल ठाकूर आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी 1 विकेट घेत चांगली साथ दिली. न्यूझीलंडकडून ग्लेन फिलिप्सने सर्वाधिक 36 धावा केल्या. त्यामुळे भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे किवींच्या आख्खा संघ 108 धावांवर गार झाला.

Prakash Harale: