रायपूर : (India vs New Zealand 2nd ODI) भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा वनडे सामना आज रायपूरच्या नवीन स्टेडियमवर रंगणार आहे. भारताने मालिकेतील पहिला सामना भारताने 12 धावांनी जिंकत यजमान संघाला पराभवाची धूळ चारली. त्यामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास द्विगुणित झाल्याचे दिसून येत आहे.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने 349 धावा केल्या तर न्यूझीलंडने खराब सुरूवातीनंतर दमदार पुनरागमन करत सामना शेवटच्या षटकापर्यंत नेत 337 धावांपर्यंत मजल मारली होती. भारताकडून शुभमन गिलने द्विशतकी खेळी केली तर मोहम्मद सिराजने 46 धावात 4 विकेट्स घेतल्या होत्या. आजच्या सामन्यात भारताला आपली डेथ ओव्हरमधील गोलंदाजी सुधारावी लागले.
दरम्यान, भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. फलंदाजीसाठी आलेल्या पाहुण्या संघाला भारताच्या वेगवान गोलंदाजांनी एकापाठोपाठ तीन जोराचे धक्के दिले. त्यामुळे न्यूझीलंड संघ खुप दबावाखाली आला आहे. मोहम्मद शमीने फिन अॅलनचा शुन्यावर त्रिफळा उडवत भारताला पहिल्याच षटकात पहिले यश मिळवून दिले. शमी-2 तर पांड्या, सिराज, ठाकूर यांनी प्रत्येकी एक बळी न्यूझीलंडची 11.3 षटकांत 24 धावांवर 5 बाद अशी अवस्था करुन टाकली आहे.