टीम इंडियाला पहिला धक्का! रोहित शर्माचे अर्धशतक हुकले, आता मदार विराट-शुबमनवर

India vs New Zealand ICC Cricket World Cup 2023 : वर्ल्ड कप २०२३मध्ये आज भारताचा सामना न्यूझीलंडशी होत आहे. या आवृत्तीचा हा २१वा सामना आहे. धर्मशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना २७३ धावा केल्या.

प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने ५० षटकांत सर्व गडी गमावून २७३ धावा केल्या. हा सामना जिंकण्यासाठी भारताला २७४ धावांची गरज आहे. न्यूझीलंडकडून डॅरिल मिशेलने सर्वाधिक १३० धावा केल्या. रचिन रवींद्रने ७५ आणि ग्लेन फिलिप्सने २३ धावांचे योगदान दिले. या तिघांव्यतिरिक्त केवळ विल यंग (१७ धावा) दुहेरी आकडा गाठू शकला. भारताकडून मोहम्मद शमीने पाच आणि कुलदीप यादवने दोन विकेट्स घेतल्या. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांना प्रत्येकी एक विकेट त्याला मदत केली. या मैदानावर न्यूझीलंडच्या गोलंदाजीसमोर या धावसंख्येचा पाठलाग करणे सोपे नसेल.

भारतीय संघाने वेगवान सुरुवात केली आहे. रोहित शर्मा आक्रमक फलंदाजी करत आहे. दुसरीकडे, शुबमन गिल पण चांगली फटकेबाजी करत आहे. शुबमन गिलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद २००० धावा पूर्ण केल्या. मात्र, बाराव्या षटकात भारताला मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहितला पव्हेलियनचा रस्ता दाखवला आहे. त्यामुळे त्याचे अर्धशतक हुकले आहे. तो 46 धावांवर बाद झाला आहे.

Prakash Harale: