दुबई : (India Vs Pakistan match Asia cup) सध्या आशिया कप 2022 स्पर्धा दुबई येथे खेळली जात आहे. भारत-पाक बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित असलेल्या पहिल्या सामन्यात भारताने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली. मात्र, आज पुन्हा एकदा हे दोन संघ आमनेसामने आले आहेत. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, या सामन्यात पाकिस्तानी संघ सर्व ताकत पणाला लावणार असून एक बदल करण्यात आला आहे. शाहनवाज दहानीच्या जागी वेगवान गोलंदाज हसन अली याला या सामन्यात स्थान देण्यात आलं आहे. तर दुसऱ्या बाजूला भारताचा अष्टपैलू खेळाडू सर रविंद्र जडेजा दुखापतीमुळे संघाबाहेर आहे, अशा परिस्थितीत भारतीय संघात दोन बदल करण्यात आले आहेत. दीपक हुड्डा संघात आला आहे तर रवी बिश्नोई देखील खेळणार आहे.
भारतीय संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, दिपक हुड्डा, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, रवि बिश्नोई
पाकिस्तानी संघ:
बाबर आजम (कर्णधार), मोहम्मद रिजवान (विकेटकीपर), फखर जमान, इफ्तिखार अहमद, आसिफ अली, खुशदिल शाह, शादाब खान, मोहम्मद नवाज, नसीम शाह, हरिस रउफ, मोहम्मद हसनैन