मेलबर्न : (India vs Pakistan T-20 World Cup Match) भारत-पाक टी20 विश्वचषक सामन्यात भारतानं 4 विकेट्सनी विजय मिळवला असून या सामन्यात हार्दिक पांड्यानं बॉल आणि बॅट दोन्हीने कमाल केल्याचं पाहायला मिळालं.
दरम्यान, आधी गोलंदाजीत 3 विकेट्स घेतल्यातर फलंदाजीत महत्त्वूपूर्ण 40 रन केले. पण या विजयानंतर मात्र हार्दिक कमालीचा भावूक झाल्याचं दिसला. हालाखीच्या परिस्थितीतून इथवर आलेल्या हार्दिकला या विजयानंतर त्याच्या घरातल्यांनी त्याच्या क्रिकेटसाठी घेतलेली मेहनत आठवली आणि मग काय तो मैदानातच ढसाढसा रडला.
वडिलांचा गाड्यांचा बिझीनेस चांगला चालत असताना, मुलांच्या क्रिकेटसाठी ते सुरतहून बडोद्याला शिफ्ट झाले. मात्र, त्यानंतर त्यांचा बसा-बसवलेला व्यवसाय तोट्यात जाऊ लागला. घरची परिस्थिती हलाखीची झाली दोन वेळच्या जेवनासाठीही संघर्ष सुरु झाला. पण या सर्वातही हार्दिकनं क्रिकेट सोडलं नाही आणि आज याच मेहनतीच्या आणि घरच्यांच्या सहकार्याच्या जोरावर जगातील स्टार ऑलराऊंडर म्हणून उभा राहिला.