गोलंदाजांनी केले आता वेळ फलंदाजांची, भारतीय संघ 160 धावांचे आव्हान पूर्ण करणार का?

मेलबर्न : (India vs Pakistan T-20 World Cup Match) भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भुवनेश्वर कुमारने पहिल्या षटकात फक्त 1 धाव देत हा निर्णय सार्थ ठरवत. दुसऱ्या षटकात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने पहिल्याच चेंडूवर पाकिस्तानचा आघाडीचा स्टार फलंदाज कर्णधार बाबर आझमला शुन्यावर बाद करत पाकिस्तानची अवस्था 1 बाद 1 धाव अशी केल्यामुळे संघाचा आत्मविश्वास काहीसा कमी झाल्याचे पहायला मिळाले.

दरम्यान, कर्णधार माघारी परतल्यावर संघाची कमान मोहम्मद रिझवानवर होती. मात्र अर्शदीप सिंगने चौथ्या षटकात मोहम्मद रिझवानला देखली 4 धावांवर बाद करत दुसरा मोठा धक्का देत 15 धावा 2 बाद अशी स्थिती झाली. त्यानंतर मसूद आणि इफ्तिकार अहमदने पाकिस्तानचा डाव सावरण्यास सुरूवात केली. सुरुवातील संथ गतीने फलंदाजी करणाऱ्या इफ्तिकार अहमदने अचानक गिअर बदलला. त्याने अश्विन आणि अक्षर पटेलला मोठे फटेक खेळण्यास सुरूवात केली. पटेलच्या एका षटकात तीन षटकार मारत आपले अर्धशतक पूर्ण केले.

मात्र पुढच्याच षटकात मोहम्मद शमीने त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. पाठोपाठ हार्दिक पांड्याने देखील शादाब खानला 5 धावांवर बाद करत पाकिस्तानची अवस्था 4 बाद 96 अशी केली. शादाबला 6 चेंडूंत 5 धावा करता आल्या. हैदर अलीने 4 चेंडूत 2 धावा केल्या, मोहम्मद नवाजने 6 चेंडूत 9 धावा केल्या. असिफ अली याने 3 चेंडूत 2 धावा, शाहिन आफ्रिदीने 8 चेंडूत 16 धावा केल्या. हरिश रैफ नाबाद 4 चेंडूत 6 धावा केल्या तर मसूदने नाबाद 42 चेंडूत 52 धावा केल्या त्यामुळे पाकिस्तानची 20 षटकात 8 विकेट्सच्या मोबदल्यात 160 धावांचे आव्हान भारतीय संघापुढे ठेवण्यात आले आहे. भारतील गोलंदाज अर्शदिप सिंग आणि हार्दिक पाड्या यांनी प्रत्येकी 3 तर भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शम्मी यांना प्रत्येकी 1 विकेट्स घेतल्या.

Prakash Harale: