मेलबर्न : (India vs Pakistan T20 World Cup 2022 Match Latest Updates) टी-20 वर्ल्ड कप 2022 हंगाम सुरु होण्यापुर्वीच क्रिकेटप्रेमींच्या आनंदावर विरजन घालणारी एक वाईट बातमी समोर आली आहे. बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित भारत आणि पाकिस्तान सामना 23 ऑक्टोबरला मेलबर्न क्रिकेट मैदानावर होणार आहे. चाहते या शानदार सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत पण हा सामना रद्द होण्याच्या शक्यता वर्तवण्यात येत आहे.
संपुर्ण जगाचे लक्ष असलेल्या भारत पाकिस्तान या सामन्यावर संकटाचे ढग फिरू लागले आहे. ऑस्ट्रेलियातील मेलबर्न मैदानावर होणारा हा सामना मुसळधार पावसामुळे रद्द होऊ शकतो. कारण, 23 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियातील मेलबर्नमध्ये दिवसभर मुसळधार पाऊस पडण्याची असल्याचे आंदाज तेथिल हमामान खात्याने वर्तवली आहे. सुपर 12 टप्प्यातील सामन्यांसाठी कोणताही राखीव दिवस नसल्यामुळे हा सामना दुसऱ्या दिवशी खेळला जाणार नाही.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा सामना मुसळधार पावसामुळे रद्द झाल्यास दोन्ही संघांना 1-1 गुण मिळतील. यासंदर्भात आयसीसीने यापूर्वीच सूचना जारी केल्या आहेत. टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारताचा पाकिस्तानविरुद्धचा विजयाचा विक्रम 5-1 असा आहे. गेल्या वर्षी T20 विश्वचषकात दोन्ही संघांमध्ये शेवटचा सामना झाला होता, ज्यामध्ये टीम इंडियाचा पराभव झाला होता. त्या पराभवाचा वचपा काढण्याची संधी भारतील संघाला चालून आली होती, मात्र पावसामुळे त्यामध्ये विरजन पडण्याची शक्यता आहे.