अहमदाबाद : (India Vs Pakistan World Cup 2023) वर्ल्डकप 2023 मधील सर्वात हाय व्होल्टेज सामना आज नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरु झाली आहे. भारत – पाकिस्तान हे दोन कट्टर प्रतिस्पर्धी पुन्हा एकदा समोरासमोर उभे ठाकणार आहेत. वनडे वर्ल्डकपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत सातवेळा लढत झाली आहे. त्या सात पैकी सातवेळा भारताने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली आहे. आज आठव्यांदा पाकिस्तानला लोळवण्यासाठी रोहितसेना कंबर कसून बसली आहे.
दरम्यान, टीम इंडियाने नाणेफेक जिंकून कर्णधार रोहित शर्माने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या डावात दव पडण्याची शक्यता असल्याने रोहितने चेस करण्याचा निर्णय घेतला. रोहितने या सामन्यात ओपनिंग फलंदाज इशान किशानच्या जागेवर शुभमन गिलला घेण्यात आलं आहे.
“मी भूतकाळावर जास्त लक्ष देत नाही. मी भविष्यावर जास्त लक्ष देतो. असे रेकॉर्ड हे तोडण्यासाठीच बनवले जातात. मी ते तोडण्याचा प्रयत्न करत आहे, असं मत सामन्यापुर्वी प्रतिक्रिया देताना पाकिस्तान कर्णधार बाबर आझम म्हणाला आहे. त्यामुळे या हाय व्होल्टेज सामन्यात कोण कोणाला धूळ चारणार याकडे संपुर्ण जगाचे लक्ष लागले आहे.