(India Vs South Africa T 20 World Cup Match) भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेत 20 षटकात 9 बाद 133 धावांपर्यंत मजल मारली. दक्षिण आफ्रिकेच्या लुंगी एन्गिडीच्या भेदक माऱ्यासमोर भारताची टॉप ऑर्डर पत्त्याच्या बंगल्या प्रमाणे कोसळली.
त्यानंतर सूर्यकुमार यादवने एकाकी झुंज देत 40 चेंडूत 68 धावांची खेळी करत भारताला शतकी मजल मारून दिली. रोहितने 15 तर विराटने 12 धावा केल्या. या तिघांनाच दुहेरी आकडा गाठता आला. आफ्रिकेकडून लुंगी एन्गिडीने 4 तर वेन पार्नेलने 3 विकेट्स घेत
भारताचे 134 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेला भारताच्या अर्शदीप सिंगने एकाच षटकात दोन मोठे धक्के दिले. सामन्याच्या दुसऱ्या आणि वैयक्तिक पहिल्या षटकात त्याने क्विंटन डिकॉकला 1 तर गेल्या सामन्यात शतकी खेळी करणाऱ्या रिली रॉसोला शुन्यावर बाद केले. यामुळे आफ्रिकेची अवस्था 2 बाद 3 धावा अशी झाली.