मुंबई : (India vs Sri Lanka ICC Cricket World Cup) आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ मधील ३३वा सामना आज मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होत आहे. श्रीलंकेचा कर्णधार कुसल मेंडिसने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
या सामन्यात भारत आणि श्रीलंका आमनेसामने आले आहेत. हे तेच मैदान आहे जिथे १२ वर्षांपूर्वी विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेचा पराभव केला होता. २०११ च्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेचा सात गडी राखून पराभव केला होता.
भारतीय कर्णधार रोहित शर्मा पहिल्याच षटकात बाद झाला आहे. कर्णधाराने पहिल्या चेंडूवर चौकार मारून खाते उघडले आणि दुसऱ्या चेंडूवर दिलशान मदुशंकाच्या चेंडूवर बाद झाला. रोहित शर्मा ४ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला आहे.