मुंबई : (India Vs Srilanka T-20 Series 1st Match 2023) शुभमन गिल आणि इशान किशन यांनी डावाची सुरुवात केली आहे. बांगलादेशविरुद्ध द्विशतक झळकावणारा किशन या सामन्यातही चांगल्या लयीत दिसत होता. पहिल्या षटकानंतर भारताची धावसंख्या बिनबाद १७ वर गेली होती. मात्र, त्यानंतर सलामीवीर शुबमन गिल केवळ ७ धावांवर बाद झाला. त्याला महेश तीक्षणाने पायचीत केले. महेश तीक्षणाच्या फिरकीने ताबडतोब फटकेबाजीला ब्रेक लावला.
त्यानंतर उपकर्णधार सूर्यकुमार यादव अवघ्या ७ धावा करून करुणारत्नेने बाद केले. पॉवर प्ले मध्ये श्रीलंकेने दमदार पुनरागमन केले. संजू सॅमसनचा झेल सुटला आणि चाहत्यांनी एकच जल्लोष केला. पण पुढच्याच चेंडूवर तो बाद झाला. पॉवर प्ले मध्ये भारताची खराब सुरुवात झाली. श्रीलंकेने टाकलेल्या जाळ्यात टीम इंडियाचे फलंदाज एकामागोमाग बाद होत गेले. आठ षटकानंतर एकाबाजूने विकेट्स पडत असताना इशान किशनने दुसरी बाजू सांभाळून ठेवली आहे. मात्र, सेट फलंदाज इशान किशन आत्तापर्यंतच्या सर्वाधिक ३७ धावा करून बाद झाला.
कर्णधार हार्दिक पांड्या २७ चेंडूत २९ धावा करून बाद झाला. १५ व्या षटकानंतर भारताच्या 100 धावा होत्या. त्यानंतर दिपक हुड्डा आणि अक्षर पटेल यांनी फलंदाजीची मदार संभाळत भारतीय संघाला अडचणीतून बाहेर काढलं आहे. दिपक हुड्डाने शानदार गगनचुंबी चार षटकारांच्या बळावर 23 चेंडूत 41 धावा केल्या, तर साथीला असलेल्या अक्षर पटेलने 20 चेंडूत 31 धावा करत श्रीलंकेला 163 धावांचं आव्हान दिलं आहे.