पुणे : (India Vs Srilanka t-20 Series 2 nd Match 2023) श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताचा १६ धावांनी पराभव झाला. पुण्यात झालेल्या सामन्यात नाणेफेक जिंकून गोलंदाजी निवडण्याचा भारताचा निर्णय चुकीचा ठरला आणि श्रीलंकेने २०६ धावा केल्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाने सातत्याने विकेट गमावल्या. निम्मा संघ 57 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला होता. मात्र, आजच्या पराभवानंतरही सूर्यकुमार यादव आणि अक्षर पटेलची भागीदारी चर्चेत राहिली. सूर्यकुमार यादव आणि अक्षर पटेल यांनी ९१ धावांची भागीदारी केली. टी-२० मध्ये सहावा विकेट किंवा त्याखाली झालेली भारताची ही सर्वात मोठी भागीदारी आहे.
हा इतिहास रचत सूर्या-अक्षरने कोहली आणि हार्दिकला मागे टाकले. सहाव्या विकेटनंतर कोहली आणि हार्दिकने इग्लंडविरुद्धच्या सामन्यात ७० धावांची सर्वात मोठी भागीदारी साकारली होती. मात्र, सूर्यकुमार यादव आणि अक्षर पटेलने त्यांच्या या कामगिरीच्या पुढे एक पाऊल टाकले आहे.
सूर्यकुमार यादवने एका टोकाकडून डाव सांभाळला आणि अक्षरने आक्रमण केले. अक्षर पटेलने २० चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. त्याने वानिंदू हसरंगाला लागोपाठ तीन चेंडूत ३ षटकार ठोकले. त्याने २० चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. सूर्यकुमार यादवनेही अर्धशतक केले पण त्यानंतर तो ५१ धावा करून तंबूत परतला. अक्षर आणि सूर्या यांच्यात ९१ धावांची भागीदारी झाली. शिवम मावीनेही १५ चेंडूत २६ धावा केल्या पण शेवटी भारत लक्ष्यापासून १६ धावांनी मागे पडला. भारतीय संघाला ८ विकेट्सवर केवळ १९० धावाच करता आल्या. त्यामुले