India vs West Indies 1st Test : वेस्ट इंडिज विरुद्ध डॉमिनिका कसोटी सामन्यात आंतरराष्ट्रीय पदार्पण करणारा युवा सलामीवीर यशस्वी जैस्वालने बॅटने कहर केला. त्याने शतकी खेळी खेळून ऐतिहासिक विक्रमांची धमाल केली. त्याच्यासोबत कर्णधार रोहित शर्मानेही कॅरेबियन गोलंदाजांना चांगलीच क्लास लावली आणि आपले शतकही पूर्ण केले. वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि पहिल्याच दिवशी संपूर्ण संघ 150 धावांवर बाद झाला. त्यानंतर खेळायला आलेल्या भारतीय फलंदांजांनी वेस्ट इंडिजची धोबी पछाड केली आहे. रोहित-यशस्वी या जोडीने 229 धावांची विक्रमी दुहेरी शतकी खेळी केली. रोहित शर्मा 103, शुभमन गिल 6, यशस्वी जैस्वाल 143, तर विराट कोहली 36 धावांवर खेळत आहेत. दुसऱ्या दिवशीचा डाव संपेपर्यंत भारत 162 धावांच्या आघाडीवर आहे.
परदेशात कसोटी पदार्पणात शतक ठोकणारा यशस्वी जैस्वाल हा पहिला भारतीय सलामीवीर ठरला आहे. याशिवाय त्याने या कसोटीत असे अनेक विक्रम केले, ज्यामुळे त्याची नोंद आता क्रिकेट इतिहासाच्या पानांमध्ये झाली आहे.
यशस्वी जैस्वालने मोडीत काढलेले विक्रम
कसोटी पदार्पणात शतक झळकावणारा सर्वात तरुण भारतीय म्हणून चौथे स्थान पटकावले आहे. तर वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी पदार्पणात शतक झळकावणारा देखील भारतीय खेळीडू म्हणून नोंद झाली आहे. देशांतर्गत क्रिकटमध्ये 70.18 सरसरी असलेल्या सचिनचा देखील विक्रम मोडीत काढला आहे. यशस्वीची सरासरी ही 80.21 एवढी आहे. रोहित आणि यशस्वी यांनी 229 धावांची सलामी देत 21 वर्षे जुना भागीदारीचा विक्रम मोडला आहे. एकही विकेट न गमावता डावात आघाडी घेण्याचा विक्रम रोहित-यशस्वी या जोडीने रचला आहे. 2008 नंतर आज सलामी जोडीने शतक झळकवले आहे.