India canada :
जून महिन्यात कॅनडामध्ये खलिस्तान समर्थक हरदीपसिंग निज्जर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मात्र, या घटनेच्या तीन महिन्यांनंतर कॅनडानं हा मुद्दा पुन्हा उपस्थित केला आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी या हत्तेमध्ये भारताचा समावेश असल्याचे सांगितले आणि भारताच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना कॅनडातून हाकलवून लावले त्यांनतर भारताने देखील कॅनडाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याची भारतातून हकालपट्टी केली
१० दिवसांपूर्वी जी २० परिषदेच्या निमित्ताने भारतात पंतप्रधान मोदींशी हस्तांदोलन करताना दिसले होते. मात्र, दोन दिवसांपूर्वी ट्रुडो यांनी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येमध्ये भारताचा सहभाग असल्याच्या दृष्टीने कॅनडाच्या तपास यंत्रणा सखोल चौकशी करत असल्याचं निवेदन कॅनडाच्या संसदेत केलं. या सर्व घटनेमुळे दोन्ही देशांमधील तणाव वाढला असून याचे आंतरराष्ट्रीय पातळीवरही त्याचे परिमाण पाहायला मिळत आहे.
या सर्व प्रकरणाचे पडसाद ब्रिटनच्या संसदेत उमटताना पाहायला मिळत आहेत. ब्रिटनच्या संसदेतील लेबर पार्टीचे शीख खासदार तन्मनजीत सिंग धेसी यांनी या प्रकरणाची नोंद घेत “कॅनडामधून येत असलेल्या बातम्या चिंताजनक आहेत. ब्रिटनमधील व विदेशातीलही अनेक शीख समुदायाच्या लोकांचे आम्हाला फोन येत आहेत. हे लोक संभ्रमित, संतप्त व घाबरलेले आहेत. कॅनडाच्या पंतप्रधानांनी त्यांच्या मित्रदेशांच्या मदतीने काम करत असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे आम्हीही ब्रिटनच्या सरकारच्या संपर्कात असून कॅनडातील या प्रकरणात न्याय होईल यासाठी प्रयत्न करू”, असं धेसी म्हणाले.
तसेच या घटनेवर या बातम्या चिंताजनक असून त्यासंदर्भात सखोल चौकशी चालू असल्याचं आम्हाला समजलं आहे. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. आम्ही यासंदर्भात भारताशीही चर्चा केली आहे”, असे म्हणत ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्रमंत्री पेनी वोंग यांनी ट्रुडो यांच्या आरोपांवर चिंता व्यक्त केली आहे.