भारत-चीन संबंधात नवा गोडवा..! दिवाळीनिमित्त सैनिकांनी एकमेकांना वाटली मिठाई

भारत-चीन संबंधात नवा गोडवा..!

पूर्व लडाख प्रत्‍यक्ष ताबा रेषा (LAC)वरील डेपसांग आणि डेमचोकमध्‍ये भारत आणि चीन सैन माघार घेण्‍याची प्रक्रिया बुधवार, ३० ऑक्‍टोबर रोजी पूर्ण झाली. यानंतर आज (दि. ३१) दिवाळीनिमित्त उभय देशांच्‍या सैनिकांनी एकमेकांना मिठाईचे वाटप केले. ‘एलएसी’च्‍या पाच बॉर्डर पर्सोनेल मीटिंग पॉइंट्सवर भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये दिवाळीनिमित्त मिठाईची देवाणघेवाण झाली.

दोन्ही बाजूंच्या सैन्याने डेमचोक आणि डेपसांग या दोन टक्कर पॉइंट्सवरून सैन्य मागे घेण्याचे पूर्ण केले आहे. आता लवकरच या पॉइंट्सवर गस्त सुरू होणार होईल. तथापि, सैन्याच्या माघारीनंतर, पडताळणी प्रक्रिया सुरू आहे. ग्राउंड कमांडर्समध्ये गस्तीची पद्धत अद्याप ठरलेली नाही. स्थानिक कमांडर स्तरावर चर्चा सुरू राहणार असल्‍याचे सूत्रांनी म्‍हटलं आहे.आज (दि. ३१) दिवाळीनिमित्त उभय देशांच्‍या सैनिकांनी एकमेकांना मिठाईचे वाटप केले. ‘एलएसी’च्‍या पाच बॉर्डर पर्सोनेल मीटिंग पॉइंट्सवर भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये दिवाळीनिमित्त मिठाईची देवाणघेवाण झाली.

सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण

परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी २१ ऑक्टोबर रोजी दिल्लीत घोषणा केली होती की, भारत आणि चीन यांच्यात एक करार झाला असून, ‘एलएसी’वर २०२० मध्ये उद्भवलेल्या समस्यांचे निराकरण केले जाईल. पूर्व लडाखमधील एलएसी बाजूने गस्त घालणे आणि सैन्य काढून टाकणे या कराराला अंतिम स्वरूप देण्यात आले. चार वर्षाच्‍या प्रदीर्घ संघर्षानंतर दोन्‍ही देशांचे यावर एकमत झाले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी सांगितले की, पूर्व लडाखमधील LAC ( प्रत्‍यक्ष नियंत्रण रेषेवर) भारत आणि चीनकडून सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली आहे.

Rashtra Sanchar: