भारताची अंतराळात भरारी, पहिलं खासगी राॅकेट विक्रम-S लाँच

नवी दिल्ली | Indias First Privately Built Rocket – भारतानं अंतराळात मोठी झेप घेतली आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (Indian Space Research Organisation) अर्थात इसरोनं (ISRO) आज पहिलं खासगी राॅकेट लाँच केलं आहे. इसरोचं पहिलं खासगी राॅकेट श्रीहरीकोटा येथून लाँच करण्यात आलं आहे. आज हे पहिलं प्रायव्हेट राॅकेट विक्रम-एस (Vikram-S) सतीश धवन अंतराळ केंद्रातून अवकाशात झेपावलं आहे. त्यामुळे भारतासाठी अवकाशात नवा अध्याय सुरू झाला आहे. तसंच हे राॅकेट 81 किलोमीटर उंचीवर जाऊन पोहोचणार आहे.

इसरोनं आज श्रीहरीकोटामधून पहिल्या खासगी राॅकेटचं प्रक्षेपण केलं आहे. विक्रम-सबऑरबिटल असं या राॅकेटचं नाव आहे. या राॅकेटची निर्मिती स्काईरूट एयरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीनं केली आहे. 550 किमी वजनाचं हे सिंगल स्पिन स्टेबलाइज्ड साॅलिड प्रोपेलेंट राॅकेट आहे. हे राॅकेट आज उड्डाण केल्यानंतर सुमारे 100 किलोमीटरपर्यंत झेप घेईल आणि त्यानंतर समुद्रात कोसळेल. या प्रक्षेपणावेळी केंद्रीय मंत्री डाॅ. जितेंद्र सिंह उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान, भारताला या मोहिमेत यश मिळालं तर खासगी अवकाश राॅकेट प्रक्षेपण क्षेत्रात जगातील आघाडीच्या देशांमध्ये भारताचं नाव सामील होणार आहे. श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित झाल्यानंतर विक्रम-एस सुमारे 100 किलोमीटर उंचीवर पोहोचेल. तसंच या मोहिमेत दोन देशी आणि एक विदेशी ग्राहक असे तीन पेलोड आहेत.

Sumitra nalawade: