भारतातून पळून गेलेल्या गँगस्टरची कॅनडात गोळ्या झाडून हत्या; जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?

Sukha Duneke | भारतातून (India) पलायन केलेल्या गँगस्टरची (Gangster) कॅनडामध्ये (Canada) गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या गँगस्टरचं नाव आहे सुखदुल सिंह उर्फ सुक्खा दुनुके (Sukha Duneke). सुक्खा दुनुके हा पंजाबमधून पळून जाऊन कॅनडामध्ये लपून बसला होता. तर A कॅटेगरीच्या या गँगस्टरची कॅनडातील पिनिपेग या शहरात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे.

गँगस्टर सुक्खा हा खलिस्तानी दहशतवादी अर्शदीप सिंह उर्फ अर्श दलाचा राईट हँड होता. त्याचा एनआयच्या वॉन्टेड लिस्टमध्ये समावेश होता. तर सुक्खा हा कॅनडामध्ये बसून भारतातील त्याच्या गँगच्या गुंडांमार्फत खंडणी उकळण्याचं काम करत होता. तर 2017 मध्ये सुक्खा बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट आणि पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट मिळवत कॅनडाला पळून गेला होता. याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता.

सुक्खाच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोईच्या गँगने घेतील होती. त्यांनी फेसबुक पोस्ट करून ही जबाबदारी घेतली आहे. कॅनडातून पळून जा, नाहीतर तुम्हाला तुमच्या पापांची शिक्षा मिळालीच म्हणून समजा, अशी धमकी देखील फेसबुक पोस्टमधून देण्यात आली आहे.

Sumitra nalawade: