राज्यपालांना पदमुक्त करण्याबाबत उपमुख्यमंत्र्यांचं सूचक वक्तव्य; म्हणाले…

पुणे | गेल्या काही दिवसांपासून राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) हे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत आहेत. तसंच आता भगतसिंग कोश्यारी हे पदमुक्त होणार असल्याची शक्यता आहे. राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या जवळील व्यक्तींकडे पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली असल्याची माहिती समोर आली आहे. कोश्यारी यांनी पुन्हा आपल्या राज्यात जाण्याची इच्छा व्यक्त केली असल्याचंही म्हटलं जात आहे. यादरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सोमवारी (29 नोव्हेंबर) पुण्यात पत्रकारांशी बोलताना कोश्यारी यांना पदमुक्त करण्याचे सूचक संकेत दिले आहेत.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पदमुक्त करण्यासाठी सर्व विरोधी पक्ष एकवटले आहेत. खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनीही काल पुण्यात राज्यपालांविरोधात नाराजी व्यक्त करत राज्यपालांवर कारवाई करण्याची आग्रही मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर पुण्यात एका कार्यक्रमासाठी आलेले देवेंद्र फडणवीस यांनी कोश्यारींना पदमुक्त करण्याचे संकेत दिले आहेत.

खासदार उदयनराजे भोसले यांच्या पाठीशी भाजप पक्ष कायम आहे. छत्रपती घराण्याचे वंशज कधीच हतबल होऊ शकत नाहीत. त्यांच्या भावना योग्य ठिकाणी पोहचल्या आहेत. राज्यपाल हे संविधानिक पद आहे. यात सरकार काही हस्तक्षेप करू शकत नाही. राज्यपालांना पदमुक्त करण्याचे अधिकार राष्ट्रपतींना आहेत, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

Sumitra nalawade: