इंदोरहून पुण्याला जाणाऱ्या बसचा नर्मदा नदीत पडून भीषण अपघात

पुणे – Indore Pune Bus Accident : आज (सोमवार) सकाळी पुण्याला जात असलेल्या बसचा अपघात झाला आहे. इंदोरहून पुण्याला प्रवास करत असलेली बस नर्मदा नदीवरील पुलावरून नदीत उसळल्याने भीषण अपघात झाला आहे. बस मध्ये जवळपास 40 प्रवासी प्रवास करत होते. अपघातात 13 प्रवासी जागीच मृत्युमुखी पडले असून 15 जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे तर उर्वरित अजून जण बेपत्ता आहेत.

इंदोर आणि पुणे प्रवासात मध्ये ही घटना घडली आहे. माहिती मिळताच एनडीआरएफच्या पथकाने बचाव कार्याला सुरुवात केली. बसमध्ये प्रवास करणाऱ्यांमध्ये महाराष्ट्रातील अनेक प्रवासी होते. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची ती बस होती. मध्य प्रदेश मधील आग्रा – मुंबई हायवेवर धार (Dhar) याठिकाणी हा भीषण अपघात झाला आहे. इंदोर पासून 80 किलोमीटर अंतरावर संजय सेतू पुलावरून बस नर्मदा नदीत कोसळली आहे.

नर्मदा नदीचा प्रवाह जोरात असल्याने बचाव कार्यात अडचणी येत असल्याची माहिती आहे. स्थानिक मासेमाऱ्यांच्या मदतीने बचावकार्य सुरू आहे.

Dnyaneshwar: