वर्क फ्रॉम होम, मूनलायटिंगबाबत नारायण मूर्ती म्हणाले…

पुणे | परराष्ट्र मंत्रालयाने पुणे येथे आयोजित आशिया इकॉनॉमिक डायलॉग या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. यामध्ये इन्फोसिसचे सह-संस्थापक (Infosys co-founder) नारायण मूर्ती (Narayana Murthy) यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी नेहमी प्रमाणे तरुण पिढीला मार्गदर्शन केले. त्यांनी विशेषतः वर्क फ्रॉम होम करणाऱ्या तरुणांना महत्त्वाचा सल्ला दिला आहे. वर्क फ्रॉम होम हे एक ट्रॅपप्रमाणे आहे यात अडकू नका असं नारायण मूर्ती यांनी म्हंटलं आहे.

तरुणांनी वर्क फ्रॉम होम करण्याच्या फंदात पडूच नये असं आवाहन नाराय मूर्ती यांनी केलं आहे . आठवड्यातून तीन दिवस कार्यालयात जाणे आणि मुनलायटिंग या गोष्टी तरुणांना करिअरमध्ये दूरवर घेऊन जाणार नाहीत असंही नारायण मूर्ती यांनी सांगितलं आहे. पुढे ते म्आहणतात, ठवड्यातून तीन दिवस ऑफिसमधून काम करणे आणि घरून काम करणे ही कल्पना चुकीची आहे. देशाचं भविष्य तरुणांच्या हातात आहे आणि कोणीही मेहनत आणि कठोर परिश्रमाशिवाय पुढे जाऊ शकत नाही म्हणून वर्क फ्रॉम हा एक ट्रॅप आहे असं त्यांनी म्हंटल आहे.

मूर्ती यांनी व्यक्त केली ‘ही’ इच्छा

भारतातील बिझनेस भातातच टिकवून ठेवायचे असतील तर निर्णय लवकरात लवकर होणं आवयक आहे. जर व्यापारी लोकांनी फक्त भारतातच राहावं आणि भारतातच सर्व काही करावं असं वाटत असेल तर मला वाटते की त्यांना हे करण्यात खूप आनंद होईल. भारतात चांगल्या कंपन्यांची कमतरता आहे. यूनीकॉर्न्स कंपन्या म्हणजेच एक अब्ज डॉलरची उलाढाल असणाऱ्या कंपन्याची कमी आहे. यामुळे खूप नुकसान होतं. मूर्ती यांनी सांगितलं की, ‘आम्हा भारतीय उद्योगपतींनी फक्त भारतातच राहायचे असेल आणि भारतातच सर्व काही करायचे असेल तर तसं करण्यात आम्हाला खूप आनंद होईल. यासाठी सरकारने निर्णय त्वरित घेतले जावे आणि त्यांची लवकरात लवकर अंमलबजावणी व्हावी, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे

Dnyaneshwar: