माझे ऑलिम्पिक आणि विश्वचषक स्पर्धेत पदक मिळवत माझ्या देशाचा तिरंगा फडकविणे हेच उद्दिष्ट असल्याचे मत भारतीय नेमबाज तेजस्विनी सावंत यांनी दै. ‘राष्ट्रसंचार’च्या जागर नवदुर्गेचा या उपक्रमात बोलताना व्यक्त केले.
तेजस्विनी सावंत या महिला नेमबाजाने जागतिक नेमबाजी स्पर्धेत विश्वविक्रमाची नोंद करीत सुवर्णपदक पटकावलं आणि भारताची मान अभिमानानं उंचावली. जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणारी ती पहिली भारतीय महिला ठरली. याआधीही अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये तिने लक्षवेधी कामगिरी करून भारतीय नेमबाजीची जगाला दखल घ्यायला लावली होती. प्रशिक्षणाचा व नेमबाजीसारख्या महागड्या खेळासाठी आवश्यक असणार्या आर्थिक पाठबळाचा अभाव यावर मात करत तेजस्विनीनं जे यश मिळवलं आहे. ते खरंच वाखाणण्याजोगे आहे.
तेजस्विनी म्हणाली की, मी एनसीसीत होते आणि तेव्हा मला माझी ही हौस थोडीफार पूर्ण करता आली. तिथेच नेमबाजीशी माझी पहिली ओळख झाली. सर्वोत्कृष्ट कॅडेट आणि सर्वोत्कृष्ट नेमबाजाची बक्षिसं मला कॉलेजात मिळाली होती. नेमबाजीची आवड तर होती, पुढे याच खेळात अजून कौशल्य मिळवावं, अशी खूप इच्छाही होती. माझ्या सुदैवाने तेव्हा माझी ओळख श्री. जयसिंह कुसाळे सरांशी झाली. श्री. कुसाळे सर हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे नेमबाज आणि कोच. ‘नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडिया’चे ते तेव्हा उपाध्यक्ष होते. १९९९ मध्ये कुसाळे सरांच्या मार्गदर्शनाखाली मी नेमबाजीचं प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली. त्या वेळी कोल्हापुरात नेमबाजीच्या सरावासाठी चांगल्या सोयी अजिबात नव्हत्या. आता आपण बसलो आहोत, त्या बालेवाडीतली ही आंतरराष्ट्रीय दर्जाची शूटिंग रेंज आहे.
पुरस्कार महिला नेमबाज :
२९ ऑगस्ट २०११ रोजी तेजस्विनीला अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, हा भारतीय खेळाडूसाठी मोठा सन्मान आहे. २००६ मध्ये तेजस्विनीची अवनीत कौर सिद्धूसह १० मीटर एअर रायफल जोडी आणि १० मीटर एअर रायफल सिंगल्समध्ये निवड झाली. दोन्ही गेममध्ये सुवर्णपदक मिळवून त्यांनी स्वत:ला सिद्ध केले. २००९ मध्ये आयएसएसएफ विश्वचषकादरम्यान, तेजस्विनीने ५० मीटर रायफल ३ पोझिशनमध्ये कांस्यपदक जिंकले. ८ ऑगस्ट २०१० रोजी, ती जर्मनीमध्ये झालेल्या ५० मीटर रायफल प्रोन स्पर्धेत जगज्जेती ठरली. जागतिक विक्रमासह जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला नेमबाजदेखील होती. २०१० मध्ये दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रकुल खेळादरम्यान, तेजस्विनीने महिलांच्या ५० मीटर रायफल एकेरी आणि महिलांच्या ५० मीटर रायफल जोडीमध्ये (मीनाकुमारीसह) रौप्यपदक जिंकले. या स्पर्धेत लज्जाकुमारी गोस्वामीनेही महिलांच्या ५० मीटर रायफल ३ पोझिशन स्पर्धेत रौप्यपदक पटकावले. तेजस्विनीने १३ एप्रिल २०१८ रोजी ५० मीटर रायफलमध्येही सुवर्णपदक जिंकले होते. या स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळवून रौप्यपदकही भारताच्या नावावर होते. याआधी याच राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०१८ मध्येही तेजस्विनीने ५० मीटर रायफल प्रोनमध्ये रौप्यपदक जिंकले होते.
तेजस्विनी सावंत ही एक महिला खेळाडू आहे, ती भारतासाठी शूटिंगमध्ये परफॉर्म करते. ती महाराष्ट्रातील कोल्हापूरची रहिवासी आहे. त्याने आंतरराष्ट्रीय खेळांमध्ये अनेक पुरस्कार आपल्या नावावर केले आहेत आणि स्वतःसह भारताचे नावलौकिक केले आहे. यासोबतच ती भारतासाठी जागतिक चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक मिळवून देणारी पहिली खेळाडू आहे. यासोबतच तेजस्विनीने चालू असलेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये ५० मीटर रायफल ३ पोझिशन फायनलमध्ये सुवर्णपदक जिंकून भारताचे नाव उंचावले, तर भारताच्या अंजुम मुदगिलनेही याच गेममध्ये रौप्यपदक जिंकले. तेजस्विनीचा जन्म १२ सप्टेंबर १९८० रोजी झाला. आणि २००६ मध्ये तिला पहिले सुवर्णपदक मिळाले. आजच्या काळात तिचे वय ३७ वर्षे आहे. अशा प्रकारे ज्यांच्याकडून आपण खेळ सुरू होण्यापूर्वीच सुवर्णपदकाची अपेक्षा करत असतो.
तेजस्विनीच्या आई-वडिलांचे नाव रवींद्र आणि सुनीता असून ते कोल्हापूरमध्ये राहतात. तिला अनुराधा पित्रे आणि विजयमाला गवळी या दोन लहान बहिणी आहेत, त्या दोघीही विवाहित आहेत. तेजस्विनीने २०१६ मध्ये पुण्यातील सुप्रसिद्ध सामाजिक व्यक्ती आणि बांधकाम व्यावसायिक समीर दरेकरसोबत लग्न केले. तेजस्विनीचे वैयक्तिक प्रशिक्षक कुहेली गांगुली आहेत, जे तेजस्विनीला नेमबाजीचे प्रशिक्षण देतात. याशिवाय तेजस्विनीला क्रीडा विभागात अधिकारी ऑन स्पेशल ड्युटी या पदावर नोकरी देण्यात आली आहे.
भारतीय खेळाडूंना ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये पदकं मिळवण्यासाठी सर्वतोपरी मदत मिळावी, या हेतूने श्री. गीत सेठी आणि प्रकाश पदुकोण यांनी ‘ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्ट’ची स्थापना केली. लिएंडर पेस, विश्वनाथन आनंद, वीरेन रस्किन्हा यांसारखे ज्येष्ठ खेळाडू या संस्थेच्या संचालकपदी आहेत. गगन नारंग, मेरी कोम, सायना नेहवाल या खेळाडूंच्या यादीत माझंही नाव आलं आणि दुप्पट जोमाने माझा सराव सुरू झाला. या वर्षीच्या म्युनिचच्या आय. एस. एस. एफ.च्या जागतिक स्पर्धेत उत्तम कामगिरी करायचीच, असं ठरवूनच मी सराव करत होते. फेब्रुवारी महिन्यात मेलबर्नला एका स्पर्धेसाठी गेले असताना कोल्हापूरला माझ्या पप्पांचं निधन झालं. खूप मोठा धक्का होता हा माझ्यासाठी आणि त्यातून बाहेर पडायला मला बराच वेळ लागला. जागतिक स्पर्धेत सहभागी होताना आत्मविश्वास जरा कमीच होता. पण महिलांच्या ५० मी. प्रोन गटात मला सुवर्णपदक मिळालं, विश्वविक्रमाची बरोबरी करता आली.
जागतिक नेमबाजी स्पर्धेत महिलांच्या गटातलं हे पहिलंच सुवर्णपदक होतं. अजूनही मैदानात झालेला टाळ्यांचा कडकडाट मला आठवतो. शेवटच्या लक्ष्यवेधानंतर सर्व प्रेक्षक उठून उभे राहून टाळ्या वाजवू लागले होते. आपल्याला सुवर्णपदक मिळालं असेल, असं वाटलं होतं. पण आपण विश्वविक्रमाची बरोबरीही केली, हे कळल्यावर मात्र खूप आनंद झाला असल्याचे तिने यावेळी सांगितले. नेमबाजी हा अतिशय महागडा खेळ आहे. मी खेळायला सुरुवात केली तेव्हा एअर रायफल गटातल्या एखाद्या स्पर्धेत भाग घ्यायचा असेल तर कमीत कमी पाच-सात हजार रुपये लागत असत. हा खर्च माझ्यासाठी खूप मोठा होता. पण सुदैवाने कोल्हापुरानं मला नेहमीच मदत केली. अनेक संस्था, व्यक्ती पाठीशी उभ्या राहिल्या. स्पर्धेआधी मला कायम आर्थिक मदत मिळत गेली.
— ( शब्दांकन : विजय कुलकर्णी )