नावीन्यपूर्ण संकल्पनांचा आदर्श : सुनील गावस्कर यांचे प्रतिपादन
पुणे : सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या सूर्यदत्त कॉलेज ऑफ मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन रिसर्च अँड टेक्नॉलॉजी (एससीएमआयआरटी), सूर्यदत्त इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायबर सिक्युरिटी (एसआयआयसीएस), सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सेस (एसआयएचेस) या संस्थांना ‘इंटरनॅशनल एज्युकेशन अॅवॉर्ड २०२२’ने सन्मानित करण्यात आले.
भारताचे माजी क्रिकेट कर्णधार सुनील गावस्कर यांच्या हस्ते ‘सूर्यदत्त’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, प्राचार्य डॉ. आरिफ शेख, प्रा. अंजली मुळीक, मोनाली मेघल आणि श्वेता यादव यांनी हा पुरस्कार स्वीकारला. शिक्षण क्षेत्रातील नावीन्यपूर्ण आणि अत्याधुनिक सेवासुविधांचा, शिक्षण प्रणालीचा अंतर्भाव करणाऱ्या शिक्षण संस्थांचा टाइम सायबर मीडिया या संस्थेमार्फत नुकताच मुंबई येथे सन्मान करण्यात आला. देदीप्यमान कामगिरी करणाऱ्या शिक्षणतज्ज्ञांचा आणि विशेष तज्ज्ञांचा या कार्यक्रमात ‘सूर्यदत्त’चा विशेष गौरव करण्यात आला. टाइम सायबर मीडियाच्या संचालिका पूजा उपस्थित होत्या.
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी सुनील गावस्कर यांना सूर्यदत्त ग्रुपच्या नव्या उपक्रमांची माहिती दिली. संस्थेच्या प्रगतीविषयी समाधान व्यक्त करीत पुढील कार्याकरिता गावस्कर यांनी शुभेच्छा दिल्या.
“एकविसावे शतक ज्ञानाचे म्हणून ओळखले जाते. जागतिक ध्येयाच्या दृष्टिकोनातून शैक्षणिक संस्था आणि संस्थाचालकांचा सन्मान माझ्या दृष्टीने महत्त्चाचा आहे. सन्मान सोहळ्याच्या निमित्ताने विद्यार्थी आणि तरुणांसमोर या संस्थांचे मौलिक काम आणि नावीन्यपूर्ण संकल्पनांचा आदर्श प्रस्थापित होईल अशी आशा आहे.”
-सुनील गावस्कर
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, कष्ट, सातत्य, नावीन्याचा ध्यास यामुळे सूर्यदत्त संस्थेच्या अनेक शाखा सदैव प्रगती करीत आहेत. अग्रेसर होत आहेत. याकरिता संस्थेतील सर्व सहकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक यांचे योगदान आहे. त्यांचे अभिनंदन करतो.