२१ जून २०२२ रोजी सिंहगड संस्थेच्या कोंढवा पुणे संकुलातील सर्व महाविद्यालयांच्या वतीने आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा करण्यात आला. यावर्षीचा विषय ‘योगा विथ ह्युमॅनिटी’ हा होता. सर्वप्रथम श्रीमती काशीबाई नवले कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य व कोंढवा संकुल संचालक डॉ. एस.डी. सावंत यांनी योगशिक्षक कविता वीरकर, संस्थापक, ओमकार योगसाधना व गर्भसंस्कार वर्ग यांचे स्वागत केले.
जागतिक योगदिनानिमित्त सिंहगड संस्थेच्या कोंढवा संकुलात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत योगा दिन साजरा करण्यात आला. ज्येष्ठ योगशिक्षक सौ. कविता वीरकर यांनी उपस्थित विद्यार्थी व प्राध्यापक तसेच कर्मचार्यांना योगसाधनेची यमनियमादि आठ अंगे, शुद्धिक्रिया, विविध आसने, मुद्रा, प्राणायाम यासंबंधी मार्गदर्शन केले व योगसाधकांनी विविध मुद्रा, आसने प्राणायाम व सूर्यनमस्कार याविषयी प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले.
दररोज योगा केल्याने शरीरावर सकारात्मक परिणाम होतो, तसेच शरीर आणि जीवन तणावमुक्त होण्यास मदत होते अशी योगशिक्षकांनी माहिती दिली. मन शांत करण्यासाठी योगा खूप फायदेशीर मानला जातो, असे योगगुरू वीरकर यांनी आपल्या मार्गदर्शनपर व्याख्यानात सांगितले.
योगाभ्यासामुळे लवचिकता, स्नायूंची ताकद व श्वसन, ऊर्जा आणि चैतन्य सुधारते, तसेच दररोजच्या योगाभ्यासाने जीवनावर सकारात्मक परिणाम होतो. योगदिनाच्या या उपक्रमाला डॉ. संजय सावंत, प्राचार्य श्रीमती काशीबाई नवले कॉलेज ऑफ फॉर्मसी, डॉ. किशोर पाटील, प्राचार्य सिंहगड अॅकडमी ऑफ इंजिनीअरिंग, प्रा.डॉ. धनंजय मंडलिक, संचालक सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस अॅडमिनीस्ट्रेशन अॅन्ड रिसर्च कोंढवा बु., प्रा.डॉ.मकरंद वझल, प्राचार्य सिंहगड कॉलेज ऑफ कॉमर्स, डॉ.सौ.नेत्रा पाटील, संचालक (एमसीए) सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन अॅन्ड रिसर्च कोंढवा बु. यांची उपस्थिती लाभली. २०० विद्यार्थी तसेच कोंढवा कॅम्पस मधील सर्व महाविद्यालयाचे प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी आंतरराष्ट्रीय योगादिन उत्साहपूर्ण साजरा केला.