‘सूर्यदत्त’मध्ये ‘ताल आरोग्यम योगथॉन’; संगीताच्या तालावर सलग तीन तास योगा

पुणे- City News | आठव्या जागतिक योग दिनानिमित्त (दि. २१ जून) सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये ‘ताल आरोग्यम योगथॉन २०२२’चे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. सलग तीन तास सुमारे ३०० कर्मचारी व ३००० विद्यार्थी व असोसिएट्स यांनी संगीताच्या तालावर योग केला. शिवाय अजून एक तास सूर्यनमस्कार घालून अखंडपणे हा योग साधणार्‍या पाच विद्यार्थ्यांना व पाच कर्मचार्‍यांना रोख पारितोषिके, सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. या अनोख्या ‘ताल आरोग्यम योगथॉन’ची विश्वविक्रमी नोंद करण्यात आली आहे. ‘सूर्यदत्त’च्या बावधन कॅम्पसमध्ये मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजल्यापासून या योगथॉनला सुरुवात झाली.

यावेळी सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, उपाध्यक्ष सुषमा चोरडिया, सहायक उपाध्यक्ष स्नेहल नवलखा यांनी देखील सर्वांसोबत पूर्णवेळ योग प्रात्यक्षिके केली. योग आणि स्वास्थ्य क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी वेळोवेळी या प्रत्यक्ष योग्य करणार्‍या प्रत्येकाकडे जातीने लक्ष देत होते. हा उपक्रम ऐच्छिक होता.

ज्येष्ठ तबलावादक अमित चौबे आणि गायक व हार्मोनियम वादक जयंतसिंग चौहान यांच्या संगीताने सहभागींना एक वेगळीच ऊर्जा दिली. यावेळी प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, सुषमा चोरडिया, स्नेहल नवलखा, योग प्रशिक्षिका सोनाली सासर, सविता गांधी यांनी सर्वांना मार्गदर्शन केले.

Dnyaneshwar: