नवी दिल्ली | 5G Internet Service – आजपासून (1 ऑक्टोबर) देशातील इंटरनेटचा वेग सुस्साट होणार आहे. कारण आजपासून देशात 5G इंटरनेट सेवा (5G Internet Service) सुरू होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते इंडिया मोबाईल काँग्रेस (India Mobile Congress – IMC 2022) कार्यक्रमात 5G इंटरनेट सेवा लाँच करण्यात येईल. त्यामुळे आता भारतातही इंटरनेटचा वेग वाढणार आहे.
5G इंटरनेट सेवा सुरू होणार या पार्श्वभूमीवर अनेक मोबाईल कंपन्यांनी आधीपासूनच 5G मोबाईलवर लक्ष केंद्रीत करण्यास सुरूवात केली होती. तसंच सध्या बाजारात अनेक 5G मोबाईलही उपलब्ध आहेत. तर काही कंपन्या सर्वात स्वस्त 5G मोबाईल देत आहेत. रिलायन्स जिओ कंपनीनं नुकताच जिओ 5G फोन (Jio 5G Phone) लाँच केला आहे.
5G इंटरनेट सेवा म्हणजे Fifth Generation अर्थात पाचवी पिढी असा आहे. ही सेल्युलर मोबाईल कम्युनिकेशनची पाचवी पिढी म्हणून ओळखली जाते. 5G नेटवर्क 2G, 3G, 4G नेटवर्कपेक्षा अधिक वेगवान असेल. 5G नेटवर्क 4G पेक्षा कमीतकमी 10 पटीने वेगानं इंटरनेट स्पीड देईल. तसंच रिलायन्स जिओ (Reliance Jio), एअरटेल (Airtel) आणि वोडाफोन आयडिया (Vodafone Idea) या कंपन्या स्पर्धेत आहेत. आता कोणती कंपनी 5G इंटरनेटची सेवे सुरु करतेय, हे पाहावं लागेल.