अखेर ठरलं! ‘या’ तारखेला होणार IPL 2023 चा लिलाव…

नवी दिल्ली : (IPL 2023 Seasonal Auction will be held date) आयपीएलच्या 16 व्या हंगामापूर्वी मिनी लिलाव होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार आयपीएल 2023 चा लिलाव 16 डिसेंबर रोजी बेंगळुरूमध्ये होणार आहे. यावर्षी सर्व संघ एक मॅच होम आणि एक विरोधी संघाच्या मैदानावर खेळतील.

आयपीएलचा या हंगाम मार्चच्या शेवटच्या आठवड्यात खेळला जाणार आहे. 2022 चा हंगाम संपूर्णपणे भारतात आयोजित करण्यात आला होता, परंतु हंगामातील लीग टप्प्यातील सामने फक्त तीन शहरांमध्ये खेळले गेले. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम आणि कोलकात्याच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर प्लेऑफचे आयोजन करण्यात आले होते.

आयपीएल 2022 च्या मेगा लिलावात संघांना 90 कोटी रुपये रक्कम मिळाली होती, परंतु यंदाच्या लिलावासाठी ते 95 कोटी रुपये केले जाऊ शकते. गेल्या वर्षी एक मेगा लिलाव झाला होता, परंतु या वर्षी हंगामापुरता मिनी लिलाव होणार आहे. त्यामुळे महत्त्वाचे खेळाडू कोणत्या संघाकडून खेळले जाणार आहेत.

Prakash Harale: