मुंबई | IPL 2023 –आयपीएलच्या कालच्या (26 एप्रिल) सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सनं (KKR) राॅयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (RCB) दारूण पराभव केला. कोलकाता संघाने पहिल्यांदा फलंदाजी करत 200 धावांचं आव्हान आरसीबीसमोर ठेवलं होतं. मात्र आरसीबीनं 20 षटकांत आठ गडी नमवत 179 धावा केल्या. त्यामुळे केकेआर संघानं आरसीबीचा 21 धावांनी पराभव केला आहे. दरम्यान, या सामन्यातील पराभवानंतर कर्णधार विराट कोहलीनं (Virat Kohli) संताप व्यक्त केला आहे.
यावेळी विराट कोहली म्हणाला की, “सामन्यात आम्हाला अपेक्षेप्रमाणे चांगला खेळ खेळता आला नाही. त्यामुळे आम्ही हरण्यासाठी पात्र आहोत. विरोधी संघाला आम्ही विजयाची संधी दिली. सामन्यात मिळालेल्या संधीचा आमच्या संघाचा फायदा घेता आला नाही. अनेक सोपे झेल आम्ही सोडले. त्यामुळे आम्हाला आणखी 25-30 धावांचा पाठलाग करावा लागला. तसंच आमचे फलंदाज सतत बाद होत राहिले. त्यामुळे आम्हाला लक्ष्य गाठता आलं नाही.”
दरम्यान, कोलकत्ता संघाने प्रथम फलंदाजी करत दोनशे धावांचा डोंगर उभारला होता. यामध्ये जेसन रॉय याची 56 धावांची आक्रमक अर्धशतकी खेळी त्यासोबतच नितेश राणा याची सुद्धा 48 धावांची महत्त्वपूर्ण खेळी आणि वेंकटेश अय्यर याच्या उपयुक्त 31 धावा तर शेवटला येत रिंकू सिंग ने दोन चौकार आणि एक षटकार मारत 18 धावा केल्या. तर दुसरीकडे, आरसीबी संघात एकट्या विराटने 54 धावा केल्या होत्या तर माहीपाल लोम रोवर याने 18 चेंडूत तीन षटकार आणि एक चौकाराच्या मदतीने 34 धावा करत संघाच्या अशा जिवंत ठेवल्या होत्या. मात्र तो सुद्धा मोठा फटका खेळण्याच्या नादात सीमा रेषेवर कॅच आऊट झाला. त्यानंतर दिनेश कार्तिकही 22 धावांवर बाद झाला आणि आरसीबी संघाच्या 20 षटकांत 179 धावा झाल्या आणि 21 धावांनी कोलकत्ताने या सीजन मधला आरसीबीवर सलग दुसरा विजय मिळवला