विराटसाठी क्रिकेट म्हणजे टाइमपास? : शाहीद आफ्रिदी

विराट कोहलीची बॅट बर्‍याच दिवसांपासून शांत आहे. जवळपास दोन वर्षांपासून त्याच्या बॅटमधून एकही शतक झाले नाही. एवढेच नाही तर अर्धशतकासाठीही त्याला झगडावे लागत आहे. अशा स्थितीत माजी खेळाडू आता त्याच्या वृत्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहेत. आता पाकिस्तानचा दिग्गज फलंदाज शाहीद आफ्रिदीने विराट कोहलीच्या वृत्तीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

पाकिस्तानचा माजी कर्णधार आफ्रिदी म्हणाला की, कोहलीचे फॉर्ममध्ये परतणे त्याच्या अ‍ॅटिट्यूडवर अवलंबून आहे. त्याला पुन्हा नंबर वन होण्याचा प्रयत्न करायचा आहे की त्याने जे काही मिळवले आहे त्यावर तो समाधानी आहे? आफ्रिदी म्हणाला की, क्रिकेटमध्ये वृत्ती सर्वात महत्त्वाची असते. त्याबद्दल मी सर्वात जास्त बोलतो. तुम्हाला क्रिकेटची आवड आहे की नाही? कोहलीला त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला जगातील नंबर वन बॅट्समन व्हायचे होते, पण तो अजूनही त्याच प्रेरणेने खेळतोय का? हा मोठा प्रश्न आहे.

RashtraSanchar: