आजच्या धावपळीच्या जगात माणसाला आपल्या आहाराकडे योग्य पद्धतीने लक्ष देता येत नाही. तसं पहायला गेलं तर सध्याच्या काळात वृद्ध लोकांनाच नाही तर युवकांमध्ये देखील मधुमेहाच (Diabetes) प्रमाण वाढत असल्याचं पहायला मिळत आहे. याची मुख्य कारण तुमची रोजची चुकीची जीवनपद्धती आणि चुकीचा आहार ही आहेत. मधुमेह हा असा आजार आहे तो अति प्रमाणात वाढला तर बरा होऊ शकणार नाही परंतु आपण त्याला थोड्या प्रमाणात का असेना नियंत्रित करू शकतो.
जर तुम्हाला रक्तातील साखर कमी करायची असेल तर फक्त डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या औषदांनी कमी होणार नाही तर त्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय देखील केले पाहिजेत.आपल्या घरामध्ये स्वयंपाक करताना आपण वेगवेगळे मसाल्याचे पदार्थ वापरत असतो. त्यातील लवंग हि आपल्याला घरगुती मसाल्यांमध्ये सहज उपलब्ध होणारी वस्तू आहे.लवंग ही तुमच्या रक्ततातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करते.चला तर मग आपण जाणून घेऊया लवंग कशाप्रकारे मधुमेह या आजारावर उपयुक्त ठरते.
मधुमेह असणाऱ्या लोकांनी सुरवातीला लवंग चा वापर अशा प्रकारे करावा. प्रथम एक ग्लासभर पाण्यात ८ ते १० लवंग उकळून घ्याव्यात. त्यानंतर त्या उखळलेल्या पाण्यातून त्या लवंग बाहेर काढून घ्या. लवंग उकळलेल पाणी थंड झालं की पिऊन घ्यावं. असं मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी कमीत-कमी तीन महिने हा उपाय करावा त्यामुळे आपल्या रक्तातील साखर कमी होऊ शकते. परंतु ज्या लोकांना मधुमेहासोबत इतर कोणते आजार असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच हा उपाय करावा. नक्की आपल्याला या घरगुती मसाल्यातील लवंग पासून फायदा होईल.