मुंबई | Makarand Deshpande Talk About Rape Scene | प्रसिद्ध रंगभूमी कलाकार, दिग्दर्शक (Director) आणि अभिनेते मकरंद देशपांडे (Actor Makarand Deshpande) हे नेहमी काही ना काही कारणामुळे चर्चेत येत असतात. ते सोशल मीडियावर (Social Media) देखील चांगलेच सक्रिय असतात. त्याचबरोबर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या आरआरआर (RRR) या चित्रपटात त्यांनी उत्तम भूमिका साकारली होती. तसंच गेल्या काही दिवसांपसून मकरंद देशपांडे हे ‘बलात्कार प्लीज स्टॅाप इट’ (Rape Please Stop It) या नवीन नाटकामुळे चर्चेत आले आहेत.
नुकतंच मकरंद देशपांडे यांची नवभारत टाईम्सने मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी त्यांच्या नाटकाबद्दल भाष्य केलं आहे. जेव्हा कधीही मी बलात्काराची बातमी वाचतो, त्यावेळी माझे मन विचलित होते. निर्भयासारखी (Nirbhaya) अमानुष बलात्कार प्रकरण ऐकल्यानंतर तर फार दु:ख झालं होते. फार संताप आला होता. एखाद्या स्त्रीला फक्त उपभोगाची वस्तू का मानले जाते? आपली आई ही देखील एक स्त्री आहे हे माहिती असते. तिला आपण देवीसमान मानतो, मग असे का?” असा संतप्त सवाल मकरंद देशपांडे यांनी विचारला आहे.
पुढे ते म्हणाले, “बलात्कारासंबंधीचे कायदे कठोर झाले आहेत. त्यामुळे अनेक गुन्हेगार हे आणखी जास्त हिंस्त्र झाले आहेत. बलात्कारपीडित महिलेची हत्या करणे, त्यांना जाळणे इत्यादी घटना सर्रास होत आहेत. पण मुद्दा हा आहे की बलात्कार पीडितांची मानसिकता कशी संपवायची? बलात्काराबद्दल क्षुल्लक आणि घृणास्पद विचार नेमंका काय? तो कसा संपवायचा? असा प्रश्नही अनेकदा माझ्या मनात येतो”.
“पण काही वर्षांपूर्वी मी ‘मुंगी’ (Mungi) या चित्रपटाचे शूटींग करत होतो. तेव्हा त्या चित्रपटात मी बलात्कार करणाऱ्या गुन्हेगाराची भूमिका साकारत होतो. त्यावेळी काही लोक तिथे शूटिंग पाहण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यातील काहीजण मला म्हणाले, ‘काय मग कसं चाललंय? तुम्हाला मजा येतेय ना? असा प्रश्न मला विचारले. त्यावेळी मला त्या प्रश्नाची फार किळस वाटली”, असंही त्यांनी म्हटलं आहे.