मुंबई : सध्या ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. बॅाक्स ऑफीसवर देखील या चित्रपटानं चांगली कमाई केली आहे. मात्र या चित्रपटावरुन राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. यासंदर्भात काही नेत्यांनी या चित्रपटाची प्रशंसा केली आहे तर काही नेत्यांनी या चित्रपटावर टीका केली आहेत. यादरम्यान आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही आतापर्यंत अनेकदा या चित्रपटाचा उल्लेख करत विरोध दर्शवला आहे. तसंच नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत देखील त्यांनी या प्रकरणावर वक्तव्य केलं आहे.
शरद पवार यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीविषयी ANI ने ट्वीट करत माहिती दिली आहे. यामध्ये शरद पवार द काश्मीर फाईल्स चित्रपटावर निशाणा साधत म्हणाले, “एका माणसाने चित्रपट (द काश्मीर फाईल्स) बनवला असून त्यात हिंदूंवर होणारे अत्याचार दाखवले आहेत. बहुसंख्य समाजाकडून अल्पसंख्याक समाजावर कसा अत्याचार होतो. जेव्हा मुस्लीम बहुसंख्यांक असतो तेव्हा हिंदू समाज स्वत:ला असुरक्षित समजतो हे यातून दिसून येते. सत्तेतील लोक या चित्रपटाचे प्रमोशन करत आहेत हे दुर्दैव आहे.”