“ती मुलगी माझ्या प्रेमात होती तेव्हा मला…”, तापसीने सांगितला ‘तो’ खास किस्सा

taapasee pannutaapasee pannu

मुंबई | लोकप्रिय अभिनेत्री तापसी पन्नू ही नेहमी काही ना काही कारणांमुळे चर्चेत येत असते. तसंच गेल्या काही दिवसांपासून ती तिचा आगामी चित्रपट ‘शाबाश मिठु’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. भारतीय महिला क्रिकेटपटू मिताली राजच्या जीवनावर आधारित या बायोपिकमध्ये तापसी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या प्रमोशनच्या वेळी दिलेल्या एका मुलाखतीत तापसीनं तिच्यासोबत घडलेला एक मजेदार किस्सा सांगितला आहे.

तापसीला ‘शाबाश मिठु’च्या प्रमोशनच्या वेळी “तुझ्यासोबत काम करणाऱ्या किंवा अन्य कोणत्याही मुलीच्या कधी प्रेमात पडली आहेस का?” असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना तापसीनं गोव्यात तिच्यासोबत घडलेला एक मजेदार किस्सा सांगितला. तापसी म्हणाली, “काम करताना नाही पण मी जेव्हा गोव्यात माझ्या मित्रांसोबत व्हेकेशनसाठी गेले होते. तेव्हा माझ्यासोबत एक मजेदार घटना घडली. मला पहिल्यांदा काही जाणवलं नव्हतं पण नंतर माझ्या एका मित्रानं मला सांगितलं की एक मुलगी माझ्या प्रेमात पडली आहे.”

पुढे तापसी म्हणाली, “माझ्या मित्राने जेव्हा मला सांगितलं की एक मुलगी माझ्या प्रेमात आहे. तेव्हा मला खूप छान वाटलं होतं कारण सामान्यत: एक मुलगी दुसऱ्या मुलीमध्ये नेहमीच चुका शोधत असते. त्यामुळे एका मुलीला मी आवडते हे समजल्यावर मला खूपच भारी वाटलं होतं.” जेव्हा हाच प्रश्न क्रिकेटर मिताली राजला विचारण्यात आला तेव्हा ती म्हणाली, “कदाचित मी पण कोणत्यातरी मुलीला आवडले असेन पण मला तसं कधी जाणवलं नाही.”

Sumitra nalawade:
whatsapp
line