चंद्रपूर : (J.P. Nadda On PM Narendra Modi) राज्यात भाजपचे (BJP) मिशन 18 लोकसभा मतदार संघांसाठी आत्तापासूनच मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. या पार्श्वभुमीवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा (J.P. Nadda) आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांच्या प्रमुख उपस्थित चंद्रपुरात (Chandrapur) पक्षाचा जाहिर मेळावा घेण्यात येत आहे. उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे (PM Narendra Modi) तोंडभरून कौतुक केलं आहे. नड्डा म्हणाले, जग जेव्हा आर्थिक संकटातून जात आहे, तेव्हा प्रत्येक देश यातून बाहेर पडण्यासाठी धडपडत असतो. आपल्या देशाला या संकटातून बाहेर काढण्यासाठी पंतप्रधान मोदी खूप प्रयत्न करत आहेत. मंदीच्या दिवसातही भारत ब्रिटनला मागे टाकून पाचव्या नंबरला गेला आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले, “मंदीच्या दिवसातही भारताची अर्थव्यवस्था चांगली आहे. आज अमेरिका आणि रशिया संकटातून जात आहेत, पण, भारत अर्थव्यवस्था स्थीर करण्याचा प्रयत्न करत आहे. आज आपण स्टीलमध्ये जगात दोन नंबरला आहोत. आपल्या देशात ५७ टक्के मोबाईल बनवले जातात”, असंही जे.पी.नड्डा म्हणाले.
या सर्व गोष्टी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात करत आहोत. आज आपण देशात आरामात आहोत, मास्क कुणीही वापरत नाही. चीन, अमेरिकेत अजुनही कोरोना मोठ्या प्रमाणात आहे. अमेरिकेत अजुनही लसीकरण पूर्ण झालेले नाही, युरोपमध्येही तिच परिस्थीती आहे. चीनची अवस्था आपण पाहतो आहे, तेच भारतात २२० कोटी लसीकरण तसेच बुस्टर डोस झाले आहेत, असंही जे.पी.नड्डा म्हणाले.