टायगर श्राॅफ- दिशा पटानीचं ब्रेकअप?; जॅकी श्राॅफ म्हणाले, “मला वाटतं…”

मुंबई | Jackie Shroff Talk About Tiger And Disha’s Breakup – अभिनेत्री दिशा पटानी लवकरच ‘एक व्हिलन रिटर्न्स’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. एकीकडे दिशाच्या या चित्रपटाची सोशल मीडयावर चर्चा असतानाच आता तिचं ब्रेकअप झाल्याच्या चर्चांनाही उधाण आलं आहे. दिशा पटानी मागच्या काही वर्षांपासून अभिनेता टायगर श्रॉफला डेट करत होती. ते बॉलिवूडच्या अनेक पार्ट्यांमध्ये तसेच कार्यक्रमात नेहमीच एकत्र दिसले होते. मात्र आता या दोघांचं ब्रेकअप झाल्याच्या चर्चा होताना दिसत आहेत. यावर टायगरचे वडील आणि अभिनेते जॅकी श्राॅफ यांनी भाष्य केलं आहे.

जॅकी श्राॅफ यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला मुलाच्या ब्रेकअप संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, टायगर आणि दिशा खूप चांगले मित्र होते आणि आजही त्यांच्यातील मैत्री कायम आहे. मी त्यांना नेहमी एकत्र फिरायला जाताना पाहिलं आहे. पण मी माझ्या मुलाच्या लव्हलाइफ वर नजर ठेवून कधीच राहिलो नाही. मी मुलांच्या पर्सनल लाइफमध्ये ढवळाढवळ करत नाही. मी ते केलं तरी ते कदाचित शेवटचं असेल. पण मला वाटतं दिशा आणि टायगर खूप घट्ट मित्र आहेत. ते कामाव्यतिरिक्त एकमेकांसोबत वेळ घालवतात.

ते त्यांचं खाजगी आयुष्य आहे त्यांनी ठरवायचं ते आयुष्य कसं जगायचं. हे संपूर्णपणे त्यांच्यावर अवलंबून आहे, हे एकत्र राहू शकतात की नाही, ते एकमेकांसाठी परफेक्ट आहेत की नाही. ही त्यांची प्रेमकहाणी आहे. अगदी माझी आणि माझ्या बायकोची जशी लव्हस्टोरी आहे अगदी तशीच. आमचं सगळ्यांचं दिशासोबत खूप चांगलं नातं आहे. आणि मला वाटतं ते जेव्हा एकत्र असतात ते खूप खूश असतात, खूप गोष्टी ते शेअर करतात.

Sumitra nalawade: