राेजगार निर्मिती व ग्रामीण विकास

मी डॉ. मंजिरी जगदीश कहाणे | मला २२ ऑक्टोबर २०२१ रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून पीएच.डी पदवी वाणिज्य व व्यवस्थापन मंडळांतर्गत प्रदान करण्यात आली. मी ‘रोजगारनिर्मिती व ग्रामीण विकासात सहकारी अधिकोष यांचे योगदान :- एक चिकित्सक अभ्यास’ या विषयावर संशोधन केले. या संशोधन कार्यासाठी साहेबरावजी बुट्टे पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. एम. जरे सर यांनी मला मार्गदर्शन केले.

मी स्वतः एका ग्रामीण भागात राहत असून ग्रामीण भागातील लोकांसाठी सहकारी बँका खूप महत्त्वाची भूमिका बजावत असतात. ग्रामीण भागातील लोकांना रोजगार उपलब्ध व्हावा त्याचप्रमाणे त्या रोजगाराच्या माध्यमातून ग्रामीण विकासास चालला मिळावी यासाठी सहकारी बँका नेहमीच प्रयत्नशील असतात परंतु हे सर्व कामकाज करत असताना सहकारी बँकांना अनेक अडचणींना देखील सामोरे जावे लागते.

त्या बँकेसमोर कोणती आव्हाने आहेत व बँकेने कशा प्रकारे ती आव्हाने स्वीकारून भविष्यात जास्तीत जास्त लोकांसाठी आपली मदत पोहोचवून ग्रामीण विकास व रोजगार निर्मितीसाठी कसे मोलाचे सहकार्य करता येईल यासाठी बँकेने काय करावे हे मी माझ्या संशोधनातून सुचविले आहे. त्यामुळे त्या संशोधनाच्या माध्यमातून भविष्यात सहकारी बँकांना असलेली आव्हाने व इतर प्रश्न सोडवण्यासाठी नक्कीच मदत होईल अशी मला अपेक्षा वाटते.

Dnyaneshwar: