मुंबई : (‘Jai Jai Maharashtra Maja’ will be the national anthem) ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे राज्यगीत होणार असल्याची माहिती सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. हे गाणं राज्य गीत झाल्यानंतर अधिकृत गाणं असलेल्या देशातील निवडक राज्यांच्या यादीत लवकरच महाराष्ट्राचा समावेश होऊ शकतो अशी माहिती मंत्री मुनगंटीवार यांनी दिली आहे.
मुनगंटीवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, जय जय महाराष्ट्र माझा हे राज्यगीत होणार असून. या गाण्यातून महाराष्ट्र राज्य, इतिहास आणि संस्कृती आणि उत्सवांचे कौतुक होईल. या विषयावर चर्चा करण्यासाठी गेल्या महिन्यात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
सध्या देशातील फक्त 11 राज्यांचेच स्वत:चे गाणे आहे. यात आता महराष्ट्राचे देखील स्वत:चे गीत असेल. अधिकृत राज्य गीत म्हणून ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या गाण्याला नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात मान्यता मिळेल, अशी माहिती मंत्री मुनगंटीवार यांनी दिली आहे.