औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीनंतर मंगळवारी रात्रीपासून शिवसेनेचे आमदार आणि केंद्रीय मंत्री एकनाथ शिंदे नॉट रिचेबल होते. तर आज सकाळी एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. त्यावेळी त्यांनी एकूण ४० पेक्षा अधिक आमदार आपल्याबरोबर असल्याचा दावा केला होता. यामुळे सरकार पडणार का? यावरुन राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला आहे. यावर आता एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी ट्विट करुन ठाकरेंचं कौतुक केलं आहे.
इम्तियाज जलील म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच खरंच कौतुक केलं पाहिजे. गेल्या काही दिवसांपासून आमच्यामध्ये मतभेद नक्कीच आहेत. परंतु आज त्यांनी इतक्या नम्रपणे जनतेशी संवाद साधला याचं कौतुक आहे. मुख्यमंत्र्यांचा नम्रपणा हा त्यांच्या पक्षातील सर्व विरोधकांना चपराक असल्याचं इम्तियाज जलील यांनी म्हटलं आहे. तसंच यांनी बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासह पक्षाच्या आमदारांना टोला देखील लगावला आहे.
दरम्यान, जलील यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे. या महाराष्ट्रानं कधीच अशी राजकीय परिस्थिती बघितलेली नाही. जिकडे पैसा मिळतो हे तिकडे पळतात अशी टीका जलील यांनी शिवसेनेच्या पाच बंडखोर आमदारांवर केली आहे. तसंच मुख्यमंत्री यांनी फेसबुकच्या माध्यमातून सांगितल की, जर माझ्याचं लोकांना मी मुख्यमंत्री म्हणून नको असेल तर त्यांनी मला माझ्या समोर येऊन सांगावं. जर शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असेल तर मी राजीनामा देण्यासाठी सुधा तयार आहे. आजच मी राजीनाम्याच पत्र तयार करत आहोत. असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत.