जम्मू-कश्मीर – २४ तासात तब्बल ‘एवढ्या’ दहशतवाद्यांचा खात्मा!

जम्मू-काश्मीर : (Jammu-Kashmir) कुपवाडामध्ये सुरक्षा दलात (Security Forces) आणि दहशतवाद्द्यांमध्ये (Terrorists) मोठी चकमक सुरु झाली आहे. मागिल २४ तासात सुरक्षा दलाच्या दलाच्या जवानांनी ६ दहशतवाद्द्यांचा (Terrorists Death) खात्मा केला आहे. मात्र, या चकमकीत जम्मू-कश्मीर पोलिसांचा एक जवानही शहीद झाला आहे. कुपवाडामध्ये घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या दहशतवाद्द्यांना ठार करण्यात आलं आहे. घटनास्थळावरुन शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.

दरम्यान, एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, जम्मू-काश्मीर पोलिसांना (Jammu and Kashmir Police) कुपवाडा येथील जुमागुंड गावातून (Jumagund village) काही दहशतवादी भारतीय सीमेत घुसण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे सुरक्षा दलांनी नाकाबंदी केली. या चकमकीत तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात सुरक्षा दलांना यश आलंय. आयजीपी काश्मीर यांनी सांगितलं की, मारले गेलेले दहशतवादी प्रतिबंधित दहशतवादी संघटना लष्करशी संबंधित होते. दहशतवाद्यांची ओळख पटवली जात आहे. घटनास्थळावरुन शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा यासह घातक साहित्य जप्त करण्यात आलं आहे.

बुधवारी झालेल्या चकमकीत जम्मू-कश्मीरातील बारामुल्ला (baramulla) इथं पोलीस आणि सुरक्षा दलांनं केलेल्या संयुक्त कारवाईत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. ठार झालेले तीनही दहशतवादी पाकिस्तानचे (Pakistan) होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. मागील २४ तासात ६ दहशतवाद्द्यांचा खत्मा करण्यात भारतीय जवानांना य

Prakash Harale: