मुंबई | Janhvi Kapoor Openly Threatened – बाॅलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरनं काही दिवसांपूर्वीच ‘काॅफी विथ करण’ या शोमध्ये हेजरी लावली होती. त्यामुळे ती चांगलीच चर्चेत आली होती. तसंच सध्या तिच्या आगामी ‘गूड लक जेरी’ या चित्रपटामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या निमित्तानं दिलेल्या मुलाखतीत तिनं आपली बहिण खुशी कपूरच्या बाॅलीवूड पदार्पणाविषयी मनमोकळा संवाद साधला आहे. यावेळी तिनं मजेमजेत म्हटलं,”जर माझ्या बहिणीला ट्रोलर्सनी त्रास दिला तर मी त्यांना संपवून टाकीन”. आपल्या बहिणीच्या आगामी ‘द आर्चिस’ सिनेमाच्या रिलीजविषयी आपण खूपच उत्सुक आहोत असं देखील जान्हवी कपूर यावेळी म्हणाली.
खुशी कपूर ही जान्हवी कपूरची लहान बहिण असून ती लवकरच झोया अख्तरच्या ‘द आर्चिस’ या सिनेमातून अभिनयसृष्टीत पदार्पण करत आहे. हा सिनेमा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. तसंच खुशी कपूर व्यतिरिक्त या सिनेमात सुहाना खान, अगस्त्य नंदा देखील महत्त्वाच्या व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहेत.
दरम्यान, जान्हवीनं एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे, मी माझी बहिण खुशीच्या पहिल्या-वहिल्या सिनेमाविषयी भलतीच उत्सुक आहे. मला खूप आनंद होतोय. मी खुशीचे एकदा आऊटडोर शूट होते तेव्हा त्यांच्या सेटवर भेट दिली होती. तेव्हा त्या सर्वजणांची एनर्जी लेवल पाहून मी थक्क झाले होते. ती सगळीच मुलं खुप मनापासून काम करताना दिसली. माझ्या बहिणीला मी पाहिलंय नं थकता कामात झोकून देताना. ती खूपच मेहनती आहे. तिनं या भूमिकेसाठी रीतसर ऑडिशन दिली होती. तिला काही केल्या हा सिनेमा मिळवायचा होता. मला खूप आनंद होतोय, जे स्वप्न तिनं पाहिलेलं ते पूर्ण होतंय आणि मी आशा करते पुढे देखील सगळं छान होईल”.