मुंबई | Javed Akhtar – सध्या बॉलिवूडचे (Bollywood) प्रसिद्ध गीतकार आणि लेखक जावेद अख्तर (Javed Akhtar) चांगलेच चर्चेत आहेत. कारण त्यांनी पाकिस्तानात (Pakistan) जाऊन मुंबई हल्ल्याबाबत (26/11 Terrorist Attack) तेथील लोकांना आरसा दाखवला आहे. त्यांनी केलेल्या त्या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. तसंच जावेद अख्तर (Javed Akhtar) यांचं भारतीयांकडून भरपूर कौतुक होताना दिसत आहे. पण, पाकिस्तानी जनतेकडून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे.
जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी पाकिस्तानमध्ये आयोजित फैज फेस्टिव्हलमध्ये हजेरी लावली होती. या कार्यक्रमामध्ये जावेद अख्तर यांनी मुंबईतील दहशतवादी हल्ल्याबाबत एक वक्तव्य केलं आहे. त्यांनी केलेल्या वक्तव्यानं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. तसंच याचा व्हिडीओही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
पाकिस्तानमधील एका कार्यक्रमामध्ये जावेद अख्तर यांनी पाकिस्तानच्या नागरिकांना आरसा दाखवला आहे. यावेळी जावेद अख्तर म्हणाले की, “आम्ही मुंबईकर आहोत. आमच्या शहरावर हल्ला झाला ते आम्ही पाहिलं आहे. मात्र, त्या हल्ल्याचे सूत्रधार अजूनही तुमच्या देशात खुलेआम फिरत आहेत. त्यामुळे एखाद्या भारतीयानं याबद्धल विचारलं तर तुम्ही वाईट वाटून घेऊ नका.” अख्तर यांनी केलेलं हे वक्तव्य सध्या प्रचंड चर्चेत आहे.
दरम्यान, जेव्हा जावेद अख्तर यांनी पाकिस्तानी नागरिकांसमोर मुंबई हल्ल्याबाबत वक्तव्य करत पाकिस्तानला जबाबदार ठरवलं. तेव्हा तिथे बसलेले पाकिस्तानी प्रेक्षक टाळ्या वाजवत असल्याचं व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे. त्यामुळे या कार्यक्रमातील अख्तर यांच्या भाषणाचं कौतुक करणाऱ्या पाकिस्तानी प्रेक्षकांना आता लक्ष्य केलं जात आहे.