अमिताभ अजिबात रोमँटिक नाहीत, जर गर्लफ्रेंड असती तर… जया बच्चन यांची ती मुलाखत आजही चर्चेचा विषय ठरते

Jaya Bachchan Birthday : 1971 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गुड्डी’ या चित्रपटातून करिअरची सुरुवात करणाऱ्या जया आज राजकारणात सक्रिय आहेत. याशिवाय जया त्यांच्या लव्ह लाईफमुळे देखील चर्चेत असतात. रेखा आणि अमिताभ बच्चन यांच्या अफेअरच्या अफवांमुळे त्यांच्या वैवाहिक आयुष्यात एकेकाळी मोठे वादळ आले होते. पण तरीही जया बच्चन आणि बिग बी अमिताभ बच्चन यांची जोडी बॉलिवूडमध्ये एवरग्रीन जोडी मानली जाते. दोघांची लव्ह स्टोरी जगप्रसिद्ध आहे. अमिताभ बच्चन किती रोमँटिक आहेत का? याबाबत जया बच्चन यांनी एका मुलाखतीत खुलासा केला आहे.

जया बच्चन आणि अमिताभ बच्चन एकदा सिमी गरेवाल यांचा सुपरहिट शो ‘रेन्डेव्हस विथ सिमी गरेवाल’मध्ये सहभागी झाले होते. तेव्हा काही प्रश्नांबाबत दोघांमध्ये विचित्र परिस्थिती निर्माण झाली होती. सिमी यांनी जया आणि अमिताभ यांच्या वैवाहिक आयुष्याबाबत काही प्रश्न विचारले होते. जया अमिताभला नवरा म्हणून किती रेटिंग देतात असा प्रश्न होता. अमिताभ रोमँटिक आहेत का? असे काही प्रश्न त्यांनी विचारले. यावर जया यांनी दिलेली उत्तरं आश्चर्यकारक होती.

जया बच्चन म्हणाल्या की, मला अमिताभ बिलकूल रोमँटिक वाटत नाही. निदान त्यांच्याबरोबर नाही. ‘कदाचित त्यांची गर्लफ्रेंड असती तर त्यांनी तिच्यासाठी फुले, वाईन आणण्यासाख्या गोष्टी केल्या असता. मात्र, माझ्याबरोबर त्यांनी या गोष्टी केल्या नसल्याचे जया बच्चन म्हणाल्या. जेव्हा जया आणि अमिताभ एकमेकांना डेट करत होतो. तेव्हा त्यांच्यात बोलणच व्हायचं नाही. अमिताभ यांना रोमान्स वेळेचा अपव्य वाटायचा. मात्र, त्यानंतर जया यांनी हे प्रकरण हाताळत अमिताभ खूप लाजाळू असल्याचे म्हटले होते. त्यावेळी जया यांची ही मुलाखत विशेष चर्चेत आली होती.

Dnyaneshwar: